लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : गावातून अवैधपणे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ट्रान्सफार्मरला धडक दिल्याने विद्युत ट्रान्सफार्मरसह सहा विद्युत खांब जागीच कोसळले. त्याचवेळी आगीचा मोठा आगडोंब निर्माण झाला, परंतु कोणतीही हानी न होता मोठा अनर्थ टळल्याने गावकऱ्यांत चर्चेचा विषय झाला आहे.याबाबत असे की, लाखनी येथील एक मोठा कंत्राटदार आपल्या स्वमालकीच्या टिप्परने रेंगेपार कोहळी येथे अरुंद गल्ली बोळातून रेतीची वाहतूक करून एका ठिकाणी टिप्पर रिकामे करीत असतो आणि तिथून नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने इतरत्र त्या रेतीचे वितरण होत असते. हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु आहे. परंतु शनिवारी गावात टिप्पर येताच वीज तार टिप्परने खेचत नेले. त्यामुळे ट्रांसफार्मरसह सहा खांब मोडले असून विद्युत विभागाची मोठी हानी झाली आहे. घटनेचेवेळी विजेचा मोठा आगडोंब उसळल्याने प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत असले तरी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गावातून अशी बेजबाबदार व अवैध वाहतूक करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे. विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एम.एच. शेंडे, जनमित्र जनई मडावी यांच्यासह पूर्ण ताफ्यासहीत घटनास्थळी हजर झाले असून दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत.विद्युतचे काम जोखमीचे असल्याने आधी विद्युत सुरळीत करण्याचे काम चालू आहे. अजून कुठेही तक्रार नोंदविली नसली तरी वरिष्ठ घटनास्थळी येत असून विद्युत सुरळीत केल्यानंतर इतर फार्मालिटीज करण्यात येईल.- एम.एच. शेंडेकनिष्ठ अभियंता, पिंपळगाव
रेंगेपार येथे वीज रोहित्राला टिप्परची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:39 AM
गावातून अवैधपणे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ट्रान्सफार्मरला धडक दिल्याने विद्युत ट्रान्सफार्मरसह सहा विद्युत खांब जागीच कोसळले. त्याचवेळी आगीचा मोठा आगडोंब निर्माण झाला, परंतु कोणतीही हानी न होता मोठा अनर्थ टळल्याने गावकऱ्यांत चर्चेचा विषय झाला आहे.
ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला। रोहित्रासह सहा वीज खांब कोसळले