लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आक्टोबर २०१७ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षकांनी मतदान अधिकाºयांपासून ते प्रशिक्षणाचे ईमानेतबारे कामे केले. परंतु त्यांच्या कामाचा मोबदला, अद्यापही न मिळाल्यामुळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तुमसर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. निवडणूक कोणतीही असो, निवडणूक आयोगातर्फे खर्चाबाबतचे नियोजन आधीच ठरलेले असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे मानधन तात्काळ देण्यात आले.परंतू ग्रामपंचयत निवडणुकीच्या मानधनाकरिता बराच विलंब झाल्याने शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी केली. आठवडाभरात ५० टक्के मानधन बँकेत जमा करण्यात येईल व उर्वरित ५० टक्के मानधन महिनाभरात जमा करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी शिक्षकांना दिले आहे. शिक्षकांच्या शिष्टमंडळात अरुण बघेले, आदेश बोंबार्डे, राजु कटरे, सुनिल मेश्राम, अरविंद कुंभरे, रविंद्र पटले, महादेव पुंडे यांचा समावेश होता.
निवडणुकीचे प्रलंबित मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:25 AM
आक्टोबर २०१७ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षकांनी मतदान अधिकाºयांपासून ते प्रशिक्षणाचे ईमानेतबारे कामे केले. परंतु त्यांच्या कामाचा मोबदला, अद्यापही न मिळाल्यामुळे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तुमसर शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.
ठळक मुद्देतहसीलदार यांना निवेदन : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची मागणी