लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील इंदिरा नगरातील महाराष्ट्र बँकेत लिंक फेलमुळे ग्राहकांना दोन दिवसापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शेकडो बँकेच्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. संगणक प्रणाली सोयीऐवजी डोकेदुखी ठरली आहे. यापेक्षा जुनीच प्रणाली चांगली होती अशी प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करीत आहेत.शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत मागील दोन ते तीन दिवसापासून लिंक फेल असल्याने खातेदार व शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपासून खातेदार नियमित बँकेत येतात व लिंक सुरुची वाट बघतात. वृद्ध, पेंशनधारक बँकेच्या फेºया मारत आहेत. अनेक महिला घरगुती कामे सोडून बँकेतून व्यवहाराकरिता बँकेत जात आहेत. महिला वर्गात तीव्र असंतोष आहे.अनेक ग्राहक लिंक सुरु होण्याची वाट बघत दोन ते तीन तास बँकेत बसत आहेत. येथील ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेचा व्यवहार दैनंदिन गरज झाली आहे. संगणकीय युगात सर्व कामे तात्काळ व अपडेट होणे गरजेची असताना क्षुल्लक लिंक येथे काम करीत नाही. येथे अशा वेळी पर्यायी व्यवस्था बँक प्रशासनाने करण्याची गरज आहे.बँकेचे व्यवस्थापन केवळ लिंक फेल हेच कारण पुढे करून आपली जबाबदारी झटकत आहे. किमान बँकेने अत्याधुनिक प्रणालीचा उपयोग करणे गरजेचे आहे. पूर्ववत बँकेचा व्यवहार सुरु करण्याची मागणी प्रा.संजय बुराडे, विक्की गायधने, प्रशांत पाखमोडे, निखील सिंगनजुडे, प्रा.बडवाईक, पवन बालपांडे यांनी केली आहे.पुणे येथील मुख्य डाटा सेंटर येथून ‘अपलोडींग’ची लिंक फेल असल्याने खातेदारांना त्रास होत आहे. वरिष्ठ पातळीवरून तांत्रिक समस्या दूर करणे सुरु आहे.-राजेंद्र डोंगरे,शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, तुमसर शाखा.
लिंक फेल, शेकडो खातेदारांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:17 PM
शहरातील इंदिरा नगरातील महाराष्ट्र बँकेत लिंक फेलमुळे ग्राहकांना दोन दिवसापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शेकडो बँकेच्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
ठळक मुद्देतीन दिवसांपासून बिघाड : तुमसरातील महाराष्टÑ बँकेतील प्रकार