लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ग्रामीण भागात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनाइंटरनेट सेवेच्या लिंक फेलचा फटका बसत असून कामकाज ठप्प होते. नेहमीच्या या प्रकाराने ग्राहक त्रस्त झाले आहे. त्यातच दूरसंचार विभागाच्या काही कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित केल्याने बँकांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. देव्हाडी व सिहोरा येथील बँकेचे व्यवहार गत काही दिवसांपासून ठप्प पडले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकाचे जाळे आहे. जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या गावात एकनाएक राष्ट्रीयकृत बँक आहे. या सर्व बँकाची सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. ऑनलाईन सेवेसाठी इंटरनेट जोडणीची गरज असते. बहुतांश बँकानी भारत सरकारच्या अधिपत्याखाली बीएसएनएलची सेवा घेतली आहे. परंतु खाजगी कंपन्यांच्या इंटरनेटसेवेनंतर बीएसएनएलची सेवा ढेपाळली आहे. याचा प्रामुख्याने फटका बँक व्यवहाराला बसत आहे. तासन्तास लिंक फेल राहत असल्याने बँकेचे व्यवहार ठप्प होतात. बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढते. त्यातून बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. नागरिकांचे व्यवहारही खोळंबतात. मात्र याबाबत कुणाकडे दाद मागावी अशा प्रश्न निर्माण होतो.सध्या बीएसएनएलची स्थिती नाजूक आहे. एकीकडे कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहे. तर दुसरीकडे टेलीफोन एक्सचेंजच्या थकीत वीज बिलापोटी महावितरण वीज पुरवठा खंडीत करीत आहे. त्यामुळे बँकाची सेवेसोबतच इतर सेवाही ठप्प होते. सध्या देव्हाडी आणि सिहोरा येथील बँक व्यवहार लिंक फेलमुळे ठप्प झाले आहे.गुरुवारी देव्हाडी येथे जनरेटरच्या साहाय्याने वीज पुरवठा सुरु करण्यात आला. त्यासाठी दरदिवशी सुमारे दोन हजार रुपये खर्च बँक प्रशासनाला करावा लागणार आहे. याचा बँक ग्राहकांना बसणार आहे. गरजूना बँकेतून रोख रकम काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सिहोरा येथील बँकेतही असाच प्रकार आहे. ग्रामीण भागात लिंक फेलची समस्या सर्वांसाठी ठोकेदुखी ठरत आहे. यावर प्रभावी उपाय योजण्याची मागणी नागरिक करीत आहेत.खातेदारांमध्ये संतापग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे. तासन्तास बँकेत उभे राहिल्यानंतर व्यवहार होत नाही. अनेकांचे आर्थिक व्यवहार यामुळे खोळंबले आहेत. तक्रार करुनही उपयोग होत नाही. बँकेचे अधिकारी व कर्मचारी हात वर करतात. बँकेने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी डॉ. पंकज कारेमोरे यांनी विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांना लिंक फेलचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM
बँकेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढते. त्यातून बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. नागरिकांचे व्यवहारही खोळंबतात. मात्र याबाबत कुणाकडे दाद मागावी अशा प्रश्न निर्माण होतो. सध्या बीएसएनएलची स्थिती नाजूक आहे. एकीकडे कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहे. तर दुसरीकडे टेलीफोन एक्सचेंजच्या थकीत वीज बिलापोटी महावितरण वीज पुरवठा खंडीत करीत आहे.
ठळक मुद्देकामकाज प्रभावित : नेहमीच्या प्रकाराने ग्राहक त्रस्त