लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नवतपा सुरु झाला असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. रेल्वे प्रवाशांना थंड पाणी मिळावे, याकरिता तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात तीन शीतल जलसेवा केंद्र सुरु करण्यात आले होते, परंतु रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंड पाण्याऐवजी कोमट पाणीपुरवठा सध्या सुरु आहे. सदर यंत्रातील गॅस संपल्याची माहिती आहे. नागपूर विभागात रेल्वेला मोठे महसूल प्राप्त करून देणाऱ्या रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. उन्हाळ्यात येथे कुल वॉटर सेवा व्हेंटीलेटरवर दिसत आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानक क्रमांक एक वर एक तथा क्रमांक दोन व तीनवर दोन कुल वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखोंचे हे वॉटर कुलर असून वाढत्या तापमानात रेल्वे प्रवाशांना कोमट पाण्यावर समाधान मानावे लागत आहे. सदर रेल्वे स्थानकावर लोकल व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. दररोज हजारो प्रवाशी येथून ये-जा करतात. जागतिक दर्जाची सेवा प्रवाशांना पुरविण्याची हमी रेल्वे प्रशासन घेते, परंतु त्याच्या उलट प्रत्यय येथे येत आहे. रेल्वे गाड्या थांबल्यावर तहानलेले शेकडो प्रवाशी थंड पाण्याच्या आशेने शीतल जल सेवा केंद्राकडे धाव घेतात, परंतु कोमट पाणी बघितल्यावर प्रचंड संताप व्यक्त करतात. शीतल केंद्र येथे नावापुरतेच लावण्यात आले काय? असा संतप्त सवाल शेकडो रेल्वे प्रवाशांनी केला आहे. महत्वपूर्ण व नागपूर विभागात रेल्वेला क्रमांक तीनचे महसूल प्राप्त करून देणाºया रेल्वे स्थानकात यंत्राची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही. उन्हाळा संपण्याकरिता १५ ते २० दिवस शिल्लक आहेत. शेकडो कर्मचारी येथे आहेत. स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांप्रती प्रचंड रोष येथे आहे.सध्या नवतपामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. प्रवाशांना उष्णतेपासून बचावासाठी थंडगार पाण्याची आवश्यकता असते. मात्र तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील जलयंत्र बिघडल्याने त्यांच्यात नाराजी आहे.यंत्र दुरुस्तीकरिता पुढाकाराची गरजरेल्वे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रभाव रेल्वे अधिकाºयांवर पडत नाही. हम करे सो कायदा असा त्यांचा तोरा पहावयास मिळतो. नवनियुक्त खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रातील विषयात दखल घेऊन कारवाईचे प्रयत्न करावे असा सुर उमटत आहे. पाण्यासारखी मुलभूत समस्या रेल्वे प्रशासन येथे दूर करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.फिक्सींगची चर्चातुमसर रोड रेल्वे स्थानक मोठे असून शेकडो प्रवाशी येथून ये-जा करतात. प्रवाशांना शीतल जल केंद्राकडून थंड पाणी मिळत नसल्याने नाईलाजास्तव थंड पाण्याच्या बॉटल्स रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांकडून खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊ नये याकरिता त्यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा रेल्वेस्थानकात सुरु आहे.भर उन्हाळ्यात शीतल जल सेवा केंद्रातून कोमट पाण्याचा पुरवठा सुरु आहे. लाखोंच्या यंत्राचा काय उपयोग. क्षुल्लक समस्या येथे दूर केली जात नाही. ही खरी शोकांतिका आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. हा तर मुजोर प्रशासनााने कळस गाठला आहे.-डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते, तुमसर.
शीतल जलयंत्रातून कोमट पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:57 PM
नवतपा सुरु झाला असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. रेल्वे प्रवाशांना थंड पाणी मिळावे, याकरिता तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात तीन शीतल जलसेवा केंद्र सुरु करण्यात आले होते, परंतु रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंड पाण्याऐवजी कोमट पाणीपुरवठा सध्या सुरु आहे. सदर यंत्रातील गॅस संपल्याची माहिती आहे. नागपूर विभागात रेल्वेला मोठे महसूल प्राप्त करून देणाऱ्या रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. उन्हाळ्यात येथे कुल वॉटर सेवा व्हेंटीलेटरवर दिसत आहे.
ठळक मुद्देतुमसर रोड रेल्वे स्थानकातील प्रकार : तीन कुल वॉटर यंत्र व्हेंटीलेटरवर, प्रवाशांमध्ये नाराजी