लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तहसिल कार्यालयातर्फे गरजु व्यक्तीच्या नावाची यादी पाठविण्याबाबद प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समितीला सांगण्यात आले होते. त्यानुसार दक्षता समितीने सभा घेवून गावातील अत्यंत गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी तयार करून तहसिल कार्यालयात ती यादी पाठविली होती. मात्र तहसिल कार्यालयातर्फे त्या यादीत फेरफार करून वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशी नुसार त्यांच्या मर्जीतील लोकांचे नावे समाविष्ठ करण्यात आल्याने गावात कलह निर्माण झाला आहे. दक्षता समितीच्या सभेत अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार चुकीची यादी तयार करण्यात आली. त्यामुळे नेत्यांनी दिलेल्या नावांची यादी मंजुर न करता ग्राम दक्षता समितीने पाठविलेल्या यादीलाच मान्यता द्यावी, या आशयाचे निवेदन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महेंद्र भेंडे, महेश पटले, श्वेता येळणे, भुपेंद्र पवनकर, रामसिंग बैस आदी सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले.
अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:11 PM