या उपक्रमासाठी लागणारे टाकाऊ पदार्थ पासून जसे प्लॅस्टिक बॉटल, मातीचे भांडेपासून साहित्य निर्मिती कशी करावी, याविषयी मार्गदर्शक म्हणून पिंकी, डिंपल व मीनल यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या पाल्याच्या मदतीने, चिमुकल्या मुलांना साथ देऊन, बर्डे फिडिंग मोहीम यशस्वी पार पाडण्यात आली. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. मनुष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्राणी-पक्ष्यांना पाणी मिळणे दुर्मिळ होतोय. यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात झाडावर पाल्ल्याच्या मदतीने बर्ड फिडिंग साहित्य लटकवण्यात आले. यात पक्षांनी अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याच्या मनसोक्त लाभ घेतले. या छोट्याश्या विद्यार्थ्यांचे कौतुक परिसरातील नागरिकांनी करीत आहे.
बर्ड फिडिंगसाठी साहित्यनिर्मिती प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:34 AM