चंदन मोटघरे लाखनीलाखनी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वसलेले महत्त्वपूर्ण तालुक्याचे गाव आहे. लाखनी व मुरमाडी हे दोन्ही गाव राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला विखुरलेल्या वसाहतीच्या स्वरूपाने आहे. दोन वर्षापूर्वी अशोका बिल्डकॉन कंपनीद्वारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. यात लाखनी शहराचा चेहरामोहरा बदलला. रूंदीकरणात काही निवासस्थाने व व्यापारी प्रतिष्ठान पाडण्यात आले. कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्यात आली.लाखनी येथे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आर्चरी पुल तयार करून शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार होते. परंतु गावातील लोकांनी आर्चरी पुलाचा विरोध केला. गाव दोन भागात विभागले जावून व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.शहरातून आर्चरी पुल व उड्डान पुल तयार न करता चौपदरीकरण करण्यात आल्याने अपघाताच्या घटनात वाढ झाली व लाखनीतील चौक धोकादायक बनले आहे. चौकात वारंवार अपघाताच्या घटना घडतात. रस्ता ओलांडताना अनेक जखमी होताना दिसून येत आहे. लाखनीतील चौक मृत्युचे द्वारे बनले आहेत.लाखनी शहरात तहसिल कार्यालय चौक, कुमार पेट्रोलपंप चौक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, लाखोरी रोड चौक अत्यंत धोकादायक आहेत. त्याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतानी दिसून येत आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे.धोकादायक वाहतूकराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा धुळे ते कलकत्ता शहरांना जोडणारा मार्ग आहे. लाखनी, मुरमाडी ५ कि़मी. पर्यंतचा रस्ता शहरातून जाणारा आहे. या मार्गातून अवजड वाहने जात असतात. भाजीपाला, फळे नाशिवंत सामुग्री घेवून एक भरधाव वेगाने ट्रकची वाहतूक सुरू होते. यातून शहरात अपघाताच्या घटना होतात. ट्रक व अवजड वाहनांना जाण्याचा पहिला हक्क आहे. परंतु स्थानिक नागरिकांचा प्रश्न महत्वाचा आहे. महामार्गाच्या लगत सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहे. सर्व्हिस रोडवर गाड्या ठेवल्या जात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील गावातून जाताना ट्रक वाहतुकदारांना यातील निर्बंध असणे आवश्यक आहे.वाहतुकीचे नियम व राष्ट्रीय महामार्गावरून रस्ता कसा ओलांडावा याचे भान नसल्यामुळे अपघाताच्या गंभीर घटना घडल्याचे दिसून येते. लाखनी, मुरमाडीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डान पुल तयार करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे महत्वाचे आहे. शहरातून अतिजलद वाहनांवर वेगाचे निर्बंध आवश्यक आहे. लाखनीसह परिसरात अनेकांना वाहतुकीचे नियम लक्षात नसल्यासारखे वाहन चालवताना दिसून येतात. पोलीस विभागाने सतर्क राहून राष्ट्रीय महार्मावर उभे असलेले वाहन चालान करणे महत्वाचे आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनामुळे भरधाव येणारी वाहने दिसत नाही. यामुळे अपघात होतात. गंभीर व किरकोळ दुखापती होतात. रस्त्यावर मांडली जाणारे दुकाने व फेरीवाल्यांचा प्रतिबंध करणे महत्वाचे आहे. ऐन चौकात मालवाहू गाड्या व आॅटो उभे केले जातात, अशा गाडीचालक व मालकाविरूद्ध कारवाई करणे आवश्यक आहे.तहसील कार्यालय चौकतहसील कार्यालय चौकाच्या जवळ शाळा, महाविद्यालये आहे. तसेच मुरमाडी, समर्थ नगरचे बस स्टॉप आहे. शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. शाळा सुरू होण्याच्या पूर्वी व सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी असते. याठिकाणी काही वेळासाठी पोलीस वाहतूक नियंत्रित करतात. या चौकात नेहमी अपघात होतात समर्थनगर बस स्टॉप आॅटोच्या रांगा लागल्या असतात. त्यामुळे रस्त्यावरून येणारे वाहन नजरेस पडत नाही. सर्व्हिस रोडवर आॅटो लावणे महत्वाचे आहे. परंतु आॅटोचालक महामार्गावर आॅटो पार्क करतात. बसेस महामार्गावर उभ्या राहतात. त्यामुळे प्रवाशांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.बाजार चौकव्यापाऱ्यांचे केंद्रबिंदू असलेले लाखनी बाजार ओळीकडे जाणारा बाजार चौक महत्वाचा आहे. सदर चौकात दुकानदार रस्त्यावर दुकान थाटून बसलेले असतात. त्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. भंडारा व साकोलीकडे जाणारे आॅटो महामार्गावर उभी असतात. शहरात ट्रक रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे पादचारी, सायकलस्वार, दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडताना कठिण समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे महामार्गावर अडचणी निर्माण होतात. भरधव वेगाने येणारे वाहन नजरेस पडत नाही. बाजार चौक हा धोकादायक आहे. त्याठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना रस्ता न समजल्यामुळे अपघातग्रस्त व्हावे लागते.जयस्तंभ चौकसालेभाटा व लाखोरीकडे जाणारा रस्ता व जुन्या लाखनीकडे जाणारा मार्ग जयस्तंभ चौकातून जात असते. त्याठिकाणी दोन चौक आहेत. जुना लाखोरी रोड व नवीन लाखोरी रोड या नावाने हे मार्ग ओळखले जातात. याठिकाणी चौकाच्या दोन्ही बाजुला राष्ट्रीयकृत बँका आहेत. यासह रुग्णालय व शासकीय कार्यालय देखील आहेत. त्यामुळे लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. लाखनी शहरात परिसरातील गावातील लोक येत असतात. वाहनांची वर्दळ असल्याने येथे किरकोळ अपघाताच्या घटना नित्याचेच होत असतात. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग असल्याने भरधाव वाहने नेहमीच धावत असतात. अनेकदा रस्ता ओलांडताना अपघात झाले आहेत.
लाखनीतील चौक ठरताहेत जीवघेणे
By admin | Published: December 04, 2015 12:52 AM