लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरराज्यीय रस्त्यासाठी पवनी ते भंडारा रोडवरील अड्याळपर्यंत अनेक वृक्षांना कापण्यात आले आहेत. यात या मार्गावर स्थित पहेला ते बोरगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही कडेला भव्य, इंग्रजकालीन १०० वर्ष जुने, डौलदार, कडूनिंबांची ती मोठी वृक्षही कापण्यात येणार होती. मात्र यासंदर्भात ग्रीन हेरीटेज संस्था भंडाराने दखल घेत याबाबत पाठपुरावा केला. यावर वनविभागाने सकारात्मक दृष्टीकोन साकारून वृक्ष कापली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.मौल्यवान, पर्यावरण पोषक व अनेक जातीच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या झाडांना कापले गेले तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे पक्ष्यांचे नुकसान होणार आहे. विकास कामे व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने दुर्लक्ष होत असून आहे त्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू असताना प्रशासन डोळे झाकून गप्प आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा विपरीत परिणाम वन्यजीवांवरती होत असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक निसर्गप्रेमी मानवतावादी पक्षीप्रेमी यांच्या मदतीने पशु, पक्षांच्या संवर्धनासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात असले तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. यासाठी परिसरातील जीर्ण झाडांची होणारी तोड थांबविली जावी, यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्थेचे संस्थापक मो.सईद शेख यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अधिकारी एस.एस. जगताप व भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्याशी चर्चा केली. यात उपरोक्त दोन्ही अधिकाऱ्यांनी महामार्ग बांधणी दरम्यान वृक्षांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगितले.
राज्यमार्गावरील ‘त्या’ वृक्षांना मिळणार जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:01 PM
आंतरराज्यीय रस्त्यासाठी पवनी ते भंडारा रोडवरील अड्याळपर्यंत अनेक वृक्षांना कापण्यात आले आहेत. यात या मार्गावर स्थित पहेला ते बोरगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही कडेला भव्य, इंग्रजकालीन १०० वर्ष जुने, डौलदार, कडूनिंबांची ती मोठी वृक्षही कापण्यात येणार होती. मात्र यासंदर्भात ग्रीन हेरीटेज संस्था भंडाराने दखल घेत याबाबत पाठपुरावा केला. यावर वनविभागाने सकारात्मक दृष्टीकोन साकारून वृक्ष कापली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
ठळक मुद्देग्रीन हेरिटेज संस्थेच्या प्रयत्नांना यश : प्रकरण भंडारा-पवनी रस्त्याचे