चांदाेरी येथील शेतकरी निताराम ताणू राऊत (७०) यांनी २०२० मध्ये किसान सन्मान याेजनेअंतर्गत् खाते उघडले हाेते. त्यांच्या खात्यात एक महिन्याचा निधीही जमा झाला. त्यानंतर वर्ष लाेटूनही निधी आला नाही. आपल्या खात्यात पैसे का जमा हाेत नाहीत, याची चाैकशी त्यांनी केली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. ऑनलाईन पाेर्टलवर त्यांना मृत घाेषित करण्यात आले. त्यामुळे त्यांना अनुदान मिळाले नाही.
वृध्दापकाळात किसान सन्मानचा निधी बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट काेसळले आहे. आता अनुदान सुरू करण्यासाठी त्यांना साकाेलीच्या तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. प्रत्यक्ष जिवंत असलेल्या माणसाला मृत घाेषित नेमके कसे केले, हे मात्र कुणी सांगत नाही.
बाॅक्स
नितारामची पायपीट
काेणत्या तरी चुकीने ऑनलाईन पाेर्टलवर नितारामला मृत घाेषित केले. तेव्हापासून निधीच आला नाही. आता निधी सुरू करण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. याविषयी नेमका काय प्रकार आहे, याची कारणे पुढे यावी आणि आपले अनुदान सुरू व्हावे, अशी मागणी निताराम राऊत यांनी केली आहे.