बॉक्स
कच्च्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व
आपल्या आहाराचे पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेतच; पण आपल्या आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी 'अ' जीवनसत्व, कबौंदकांच्या पचनासाठी 'ब' जीवनसत्व तर स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी 'ई' जीवनसत्वाची गरज असते. हाडांच्या बळकटीसाठी 'ड' जीवनसत्व, रक्तासाठी 'के' जीवनसत्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. ही सर्व जीवनसत्वांची गरज आपण विविध पालेभाज्या आणि कडधान्यातून भागवता येते.
बॉक्स
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच
आपल्या आहारात दररोज पौष्टिक भाज्या, ताजी फळे, दूध यांसारख्या पदार्थांचा वापर असायलाच हवा. याशिवाय कडधान्यांचाही समावेश हवा, यामुळे शरिराची दररोज होणारी झिज भरुन निघते. पालेभाज्यात पालकात ल्युटीन असते. यात अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. पालकांत अँटी-ऑक्सिडेंटदेखील असतात. ते सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या हानीचे डोळ्यांचे रक्षण करते. मशरूममध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आढळतात. मशरूममध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, लोह आणि इतर अनेक खनिजे असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. दूध आणि दही हाडे आणि दात यांच्यासाठी आरोग्यदायी आहेत. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, थायमिन, राइबोफ्लेविन, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी असते. दही हा प्रोबायोटिक आहार आहे. दूध आणि दही आहारात घेतले पाहिजे.
बॉक्स
फास्टफूडवर अघोषित बंदी
कोरोनामुळे अनेकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे कमी केले आहे; मात्र एरव्ही अनेक जण फास्टफूड आवडीने खात होते. आता मात्र एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आरोग्यावर फास्टफूडचा होणारा परिणाम यामुळे सध्या फास्टफूडवर अघोषित बंदीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.