लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मे महिन्याला सुरुवात झाल्याने तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. नागरिकांना दिवसेंदिवस उकाडा असह्य होत आहे. मात्र अशा परिस्थितीत पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक वीजेअभावी त्रस्त झाले आहेत.लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वीज वितरण कर्मचाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.गत वर्षभरापासून पालांदूर ग्रामपंचायततर्फे वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन उर्जामंत्री बावनकुळे यांना देखील निवेदन देऊन समस्या मांडण्यात आली होती. मात्र आजही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.पालांदूर येथे महावितरणचे कार्यालय आहे. आसगाव येथून १३२ केव्ही वरुन पालांदूरात ३३ केव्हीची वीज वाहिणी जोडलेली आहे. हे अंतर २८ किमी असून या वाहीणीवर असलेले सगळे साहित्य जुनाट आहे. त्यामुळे वादळी वारा, पाऊस आल्यावर वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे.शुक्रवारी रात्री आसगाव परिसरात आलेल्या सोसाट्याच्या वाºयासह वादळाने दोन ठिकाणी वीज पडून इन्स्यूलेटर फुटले. त्यामुळे संपूर्ण रात्र पालांदूर परिसरातील नागरिकांना अंधारात काढावी लागली.पालांदूर वीज कार्यालयाचे अभियंता मयंक सिंग व हिरामण बारई यांच्या प्रयत्नाने अखेर सकाळी वीज जोडणी करण्यात आली. भरमसाठ येणारी वीज बिले पाहता. विज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी येथील साहित्य बदलून नागरिकांची वीजेची समस्या कायमस्वरुपी सोडविण्याची गरज आहे.वीज ग्राहकांचे लोकप्रतिनिधींकडे साकडेपालांदूर परिसरात पाण्याची सोय असल्याने अनेक शेतकरी बागायती शेती करतात. बारव्हा, लाखांदूर, सानगडी आदी सबस्टेशनला दुय्यम पुरवठ्याची जोडणी केलेली आहे. याचप्रकारे पालांदूरची देखील कायमची वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे. याकडे अधिकाºयांनीही लक्ष देण्याची गरज आहे.पालांदूर येथे असणारी वीजेची समस्या वरिष्ठांना कळवली आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे. पालांदूर ते दिघोरी ३३ केव्ही दुय्यम वीज वाहिणीचे काम भविष्यात होऊ शकते.- मयंक सिंग,सहायक अभियंता पालांदूर
४८ गावांचा भार एकाच वीज वाहिणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील ४८ गावे एकाच ३१ केव्ही वीज वाहिणी आसगाववर अवलंबून आहेत. त्यामुळे एकाच वाहीनीवर वीजेचा भार वाढला असल्याने परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देपालांदूर परिसरात दुय्यम वीज वाहणी आवश्यक : वारंवार होतोय वीज पुरवठा खंडीत