शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:19 AM

पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,.....

विशाल रणदिवे ।ऑनलाईन लोकमतअड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यात दिपसन गायकवाड यांच्या नेतृत्वात २० ग्रामस्थ सहभाग झाले असून ६० ते ७० वर्षे वयोगटातील वृध्द महिलांचाही यात समावेश आहे.केसलवाडा गटग्रामपंचायत मधील गौण खनिज उत्खनन परवाना देताना सरपंच जिजाबाई चंदनबावणे व सचिव आर.खंडाईत यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेऊन परवाना दिल्याचा आरोप सिध्द होऊनही संबंधिताविरूद्ध कुठलिही कारवाई झाली झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सात दिवसाचा अवधी दिला असून त्यात ते दोषी असल्याचेही म्हटले आहे. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात आला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रीया ग्रामस्थां समक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी दिली. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.गौण खनिज उत्खननाचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. हाच ठराव जिल्हा खनिकर्म कार्यालयात पाठविला जातो, असा नियम असताना सुध्दा हा ठराव घेण्यात आला. मासिक सभेत सादर केलेला हा ठराव व ग्रामसभेचा ठराव याची माहिती ज्यावेळी माहिती अधिकाराअंतर्गत ग्रामस्थांनी मागितली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभाग तथा अधिकाºयांना निवेदने दिले. परंतु याविषयी अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे ग्रास्थांनी ही भूमिका घेतल्याचे उपोषणकर्ता दिवसन गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एकीकडे गौण खनिज उत्खणन ठराव कोणत्या पध्दतीने होतात हेच अधिकारी सांगतात. त्यात ग्रामसभा नियमाचे उल्लंघन केले, असेही सांगतात. चौकशी अहवालातही सरपंच तथा ग्रामसेवक यांच्याविरूद्ध दोष सिध्द झाले असतानाही आजपावेतो कारवाई करण्यात आली नाही? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा दिला होता. त्यानंतर तीन महिने संबंधित विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांनी पायपीट केली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.