लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : उन्हाळ्यात मातीच्या मडक्यामध्ये थंडगार पाणी राहते. त्यामुळे या मडक्यामधील थंड पाण्यामुळे उन्हापासून मोठा दिलासा मिळतो. यामुळेच या मडक्यांना गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाते. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे या मााठांच्या विक्री होत नसल्यामुळे कुंभार समाजावर मोठे संकट आले आहे.भूमिहीन असणारा व घरात ठराविश्व दारिद्रय असणारा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून संसारउपयोगी भांडे बनविणे, मडके बनविणे, माठांची निर्मितीसह मूर्ती बनविने व त्यांची विक्री करणे. या विक्रीतूनच घराची अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहतो. त्यातूनच काही प्रमाणात घरांचा उदरनिर्वाहर चालतो. पण आधुनिक काळात कुंभार समाजाचा व्यवसाय डबघाईस आला आहे. पण अजुनही मातीच्या काही वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.पवनीमध्ये बाजार चौकात वीस पंचवीस घराची कुंभार समाजाची वस्ती आहे. येथे अगोदर मातीला चांगल्या प्रकारे मळून चाकावर विविध प्रकारची भांडी बनवून त्यांची भट्टी लावून त्यांना पकवले जायचे. या मातीच्या भांड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री व्हायची. पण काळाच्या ओघात माती मिळणे व भट्टीसाठी सरपन मिळणे कठीण झाले. त्यामुळे मातीची भांडी तयार करणे बंद झाले. त्यामुळे पालांदूर, किटाडी, तिड्डी येथून कुंभार समाजाने तयार केलेले मातीचे साहित्य खरेदी करून येवू लागले.उन्हाचे दिवस सुरू झाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच मोठ्या प्रमाणात मातीचे मडके व इतर साहित्य बेलावण्यात आले. जवळपास पंधरा महिला व पुरूष हे मडके विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी सात ते आठ लक्ष रूपयाचे साहित्य खरेदी केलेले आहे. पण देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू केल्यामुळे या थंड पाण्याच्या मडक्यांची विक्रीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे कुंभार समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पण तरीही २६ एप्रिलला अक्षयतृतीया असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील खरेदीदार येवून काही प्रमाणात मडक्यांची विक्री होण्याची अपेक्षा आहे.
लॉकडाऊनमुळे गरिबांच्या फ्रीजची विक्री थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 5:00 AM
भूमिहीन असणारा व घरात ठराविश्व दारिद्रय असणारा कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय मातीपासून संसारउपयोगी भांडे बनविणे, मडके बनविणे, माठांची निर्मितीसह मूर्ती बनविने व त्यांची विक्री करणे. या विक्रीतूनच घराची अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहतो. त्यातूनच काही प्रमाणात घरांचा उदरनिर्वाहर चालतो. पण आधुनिक काळात कुंभार समाजाचा व्यवसाय डबघाईस आला आहे.
ठळक मुद्देकुंभार समाज संकटात : अक्षयतृतियेचा सणही तोंडावर