लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशाच्या महाऊत्सवाची अर्थात लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून आतापर्यंत दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तिसरे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १० एप्रिल रोजी पोलिंग पार्टी आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर पोहचणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. या सहाही क्षेत्रात अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.निवडणुकीचे कामकाज कसे करावे, आयोगाच्या सूचना, मतदानाची तयारी, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची माहिती आदिंवर प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी निवडणुकीत व्हीव्ही पॅट यंत्राचा वापर होणार आहे. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. यासोबतच पोलीस पार्टी, एसएसपी, एफएसपी, निवडणूक खर्च तीन, विविध नोडल अधिकारी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कार्यात सुसुत्रता व अचूकता घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून निवडणूक विभागाच्या वतीने संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले आहे.सदर प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी शांतनू गोयल यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, तुमसरचे मुकुंद टोणगावकर, साकोलीच्या मनिषा दांडगे, अर्जुनी मोरगावच्या शिल्पा सोनाले, तिरोडाचे व्ही. एम. तळपदे आणि गोंदिया येथील ए.एल. वालस्कर यांनी पूर्ण केले.वंचित न राहो कुणी मतदारलोकसभा निवडणुकीत एकही मतदार निवडणुकीपासून वंचित राहू नये यासाठी मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. ‘वंचित न राहो कोणी मतदार’ हे ब्रिद घेऊन विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यात शाळा, महाविद्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, विविध शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. कलापथक, पोस्टर्स, बॅनर्स, जिंगल्स, होर्डींग आदीच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.
Lok Sabha Election 2019; १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 12:59 AM
देशाच्या महाऊत्सवाची अर्थात लोकसभेच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर सज्जता झाली असून आतापर्यंत दोन प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. १० हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी दोन प्रशिक्षण पूर्ण : १० एप्रिलला होणार पोलिंग पार्टी रवाना