शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

Lok Sabha Election 2019; क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:41 PM

भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे. मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. मात्र आपण या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : देशाच्या चौकीदारांकडून युवकांना चौकीदार बनण्याचे निमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. उलट लोकांच्या अपेक्षांचा भंग केला असून महागाई आणि बेरोजगारीची भेट दिली आहे. मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. मात्र आपण या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तिरोडा तालुक्यात आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे व माजी आ.दिलीप बन्सोड, पंचम बिसेन, विजय शिवणकर, योगेंद्र भगत, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, अर्जुन नागपुरे, घनश्याम मस्करे, कृष्णकुमार जायस्वाल, विमल नागपुरे, तुलीसराम बघेले, रिना रोकडे, निता पटले, रिना बघेले उपस्थित होते.खासदार पटेल म्हणाले, आई-वडील काबाळ कष्ट करुन मुलांना शिकवून अधिकारी बनविण्याचा प्रयत्न करतात. मात्र देशाचा चौकीदार सुशिक्षित तरुणांना चौकीदार बनण्याचे निमंत्रण देऊन लाखो आई-वडीलांच्या स्वप्न आणि अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम करीत असल्याची टिका केली.भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पुर्तता न करता उलट बेरोजगारांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचा सल्ला दिला. तर जीएसटी लागू करुन व्यापार डबघाईस आणला व पेट्रोल व डिझेलचे दर वाढवून सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केले. त्यामुळे आता मतदारांनाच योग्य काय आहे ते ठरवून आपला लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे. नाना पंचबुध्दे हे माजी राज्यमंत्री राहिले असून यापुढे सुध्दा त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. त्यामुळे ११ एप्रिलला मतदान करताना खोट्या आश्वासनला बळी पडून मतदान करु नकातर सजगपणे मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.