लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणूक अंतर्गत विधानसभा मतदार संघ निहाय मतदार नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरु होती. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात नव्याने एकूण १७ हजार २९६ मतदारांचा सहभाग यादीत झाला आहे. त्यामुळे आता लोकसभा क्षेत्रात एकूण १८ लक्ष ८ हजार ९४८ मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी शांतनु गोयल यांनी दिली.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामांचा आढावा व माहिती देण्यासंदर्भात गुरुवारी सांयकाळी ५.३० वाजता पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक घोषित झाली तेव्हा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात १७ लक्ष ९१ हजार ६५२ मतदार होते. मात्र १५ मार्चपर्यंत मतदारांच्या नियमित नोंदणीनुसार त्यात अजून भर पडली. त्यामुळे नव्याने १७ हजार २९६ मतदार वाढले आहेत. निवडणूकीच्या रिंगणात १४ उमेदवार उभे असल्याचे सांगून त्यांनी लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय संघात लक्ष ठेवण्यासाठी २३ पथके नियुक्त करण्यात आल्याचे सांगीतले.निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांवर गुन्ह्याची नोंद असल्यास त्याची माहिती प्रसारमाध्यमातून प्रकाशित करायची आहे. जे उमेदवार गुन्ह्याची माहिती प्रकाशित करणार नाही, अशा उमेदवारांची माहिती निवडणुक आयोगाला सादर करु असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.मतदारांना ५ तारखेपासून मिळणार व्होटर स्लिपज्या मतदारांची नावे यादीत आहेत, अशा मतदारांना ५ एप्रिलपासून बीएलओ व कर्मचाऱ्यांमार्फत व्होटर स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे. या व्होटर स्लिपच्या माध्यमातून मतदार मतदान करु शकतील, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. नव्याने वाढ झालेल्या मतदार यादीत भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात ८,०५० पुरुष तर ९,२४४ महिला मतदारांची संख्या आहे.निवडणुकीसाठी १० हजार ५३९ कर्मचारीनिवडणूक कार्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील एकूण सहा विधानसभा क्षेत्रात १० हजार ५३९ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तुमसर विधानसभा क्षेत्रात १९६८, भंडारा २१७८, साकोली २११४, अर्जुनी मोरगाव १३८९, तिरोडा १२९९ तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात १५९१ कर्मचाºयांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २१७७ मतदान केंद्रांसाठी २९०९ ईव्हीएमची सोय करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2019; भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १७ हजार २९६ मतदारांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 9:41 PM
लोकसभा निवडणूक अंतर्गत विधानसभा मतदार संघ निहाय मतदार नोंदणीची प्रक्रिया १५ मार्चपर्यंत सुरु होती. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात नव्याने एकूण १७ हजार २९६ मतदारांचा सहभाग यादीत झाला आहे.
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती