लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एरवी मतदान केंद्रात पुरुषांची मक्तेदारी पहावयास मिळत होती. परंतू गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील खापा येथील सखी मतदान केंद्रावर महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडल्याचे दिसून आले. मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून येथे ५७ टक्के मतदान झाले.केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक सखी मतदान केंद्र निर्माण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने खापा येथील जिल्हा परिषद पुर्व प्राथमिक शाळेत सखी मतदान केंद्र निर्माण करण्यात आले. याठिकाणी सर्व महिला अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली. चार महिला अधिकारी व कर्मचाºयांचा त्यात समावेश होता. या मतदान केंद्रावर महिला व पुरुषांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.मतदान केंद्राच्या दर्शनी भागात मंडप घालण्यात आला होता. यावेळी आशा वर्कर उपस्थित होत्या. महिला पोलीस तथा होमगार्ड तैनात करण्यात आले होते. यावरुन महिला कुठेही कमी नसून लोकशाहीच्या महाउत्सवात यशस्वी जबाबदारी पार पाडली.
Lok Sabha Election 2019; सखी मतदान केंद्रावर उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:02 PM
एरवी मतदान केंद्रात पुरुषांची मक्तेदारी पहावयास मिळत होती. परंतू गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील खापा येथील सखी मतदान केंद्रावर महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देखापा केंद्र : महिला अधिकाऱ्यांनी बजावली यशस्वी कामगिरी