शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2019; असा आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:55 AM

ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते. निवडणुकीत पारदर्शकतेसाठी या यंत्राची भूमीका महत्वाची आहे. लोकसभा निवडणूक २०१९ पासून सर्व मतदारसंघात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रदेखील उपयोगात आणण्यात येणार आहे. ईव्हीएम ते व्हीव्हीपॅट या प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात इतिहास.पूर्वी मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान होत असे. मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रीयेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल.शेकदार यांनी ईलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली. १९७९ मध्ये सर्वप्रथम प्रोटो-टाईम ईव्हीएम तयार करण्यात आले. १९८०-८१ मध्ये ईलेक्ट्रॉनिक कॉपोर्रेशन आॅफ इंडिया आणि भारत ईलेक्टॉनिक्स लिमिटेड या संस्थांनी हे यंत्र तयार करून त्याचे सादरीकरण केले. भारत निवडणूक आयोगाने ६ आॅगस्ट १९८० मध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या यंत्राचे सादरीकरण केले.जानेवारी १९८१ मध्ये बेलने निवडणूक आयोगासमोर ही यंत्रे बनविण्याचा प्रस्ताव ठेवला. २९ जुलै १९८१ मध्ये निवडणूक आयोगाने बेल, ईसीआयएल, विधी व न्याय मंत्रालय आणि काही राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावरही यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला. १९ मे १९८२ मध्ये केरळ राज्यातील परुर विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रावर ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३ मध्ये ८ राज्य आणि एक केंद्रशासीत प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम वापरण्यास मनाई करण्याचा निर्णय दिल्याने या यंत्राचा वापर स्थगित करण्यात आला. १९८८ मध्ये कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर १५ मार्च १९८९ पासून ईव्हीएमचा वापर सुरू करण्यात आला. जानवोरी १९९९ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात एकमताने ईव्हीएम वापरण्याची शिफारस केली. सन २००० नंतर झालेल्या तीन लोकसभा आणि ११८ विधानसभा निवडणूकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. आतापर्यंत २५० कोटी मतदारांनी समाधानकारकरित्या ईव्हीएमद्वारे मतदान केले आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेण्याबाबतची याचिका खारीज केल्याने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकामधील मतदानदेखील ईव्हीएमद्वारे होत आहेत. दरम्यान १४ आॅगस्ट २०१३ रोजी ‘द कन्डक्ट आॅफ रुल’ १९६१ मध्ये सुधारणा करून व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालँडमधील ५१ -नोकसेन विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ ला दिलेल्या निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर वाढविण्यात आला. मे २०१७ पासून सर्व निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशात सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर होत आहे. व्हीव्हीपॅट स्लिपवर मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह प्रदर्शित होते. ही स्लिप पाच वर्षापर्यंत सुस्थितीत राहू शकते. आतापर्यंत १८ कोटी मतदारांनी व्हीव्हीपॅटच्या आधारे मतदान केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक