लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांचे नामांकन छाननीत रद्द झाले. आता २३ उमेदवार रिंगणात असून अर्ज मागे घेण्याच्या २८ मार्च या शेवटच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात हे स्पष्ट होणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात २५ मार्च पर्यंत ३४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. मंगळवारी या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात रमेश जीवलंग खोब्रागडे (अपक्ष), अनिल बावनकर (राष्ट्रवादी), रमेश तुकाराम टिचकुले (अपक्ष), कुलदीपसिंह विरसिंह बाच्छील (अपक्ष), राजेश नीळकंठ चोपकर (अपक्ष), डॉ.परिणय फुके (भाजपा), धनंजय शामलाल राजभोज (अपक्ष), रामविलास शोभेलाला मस्करे (अपक्ष), मनोहर बिसन मते (बहुजन मुक्ती पार्टी), रामलाल गोस्वामी (अपक्ष), अनिल दयाराम मेश्राम (अपक्ष) यांचा समावेश आहे. ११ उमेदवारांचे नामांकन रद्द झाल्याने आता २३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांपैकी कुणाचाही अर्ज बाद झाला नाही. मात्र निवडणुकीच्या लढतीचे चित्र उमेदवारी मागे घेण्याच्या २८ मार्च या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.कोण उमेदवारी मागे घेणार आणि कोणाचे नामांकन कायम राहणार याकडे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.१६ अपक्ष रिंगणातनामांकन अर्जाची छाननी झाल्यानंतर आठ अपक्ष उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले. सोमवारी २४ अपक्ष उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. आता छाननी नंतर १६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील किती उमेदवार नामांकन मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपक्षांनी नामांकन मागे घ्यावे म्हणून त्यांची मनधरणी केली जाणार आहे.नामांकन वैध ठरलेले उमेदवारनाना पंचबुद्धे राष्ट्रवादी काँग्रेसविजया नांदूरकर बहुजन समाज पार्टीसुनील मेंढे भारतीय जनता पार्टीकारु नान्हे वंचित बहुजन आघाडीभीमराव बोरकर पीपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमोक्रॉटीकभोजलाल मरसकोल्हे भारतीय शक्ती चेतना पार्टीराजकुमार भेलावे पीपल्स रिपब्लिकन पार्टीअतुल हलमारे अपक्ष ग्यानीराम आमकर अपक्षनिलेश कलचुरी अपक्ष प्रमोद गजभिये अपक्षविरेंद्रकुमार जायस्वाल अपक्ष तारका नेपाले अपक्षदेवीदास लांजेवार अपक्ष राजू निर्वाण अपक्षराजेंद्र पटले अपक्ष प्रकाश मालगावे अपक्षखुशाल बोपचे अपक्ष मोरेश्वर काटेखाये अपक्षविलास राऊत अपक्ष सुनील चवळे अपक्षसुमीत पांडे अपक्ष सुहास फुंडे अपक्ष
Lok Sabha Election 2019; ११ उमेदवारांचे नामांकन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:11 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांचे नामांकन छाननीत रद्द झाले. आता २३ उमेदवार रिंगणात असून अर्ज मागे घेण्याच्या २८ मार्च या शेवटच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात हे स्पष्ट होणार आहे.
ठळक मुद्दे२३ जण रिंगणात : सर्वांच्या नजरा उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाकडे