संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : अविश्वास ठरावावरून साकोली नगरपरिषदेत उठलेले वादळ अखेर नगराध्यक्षांच्या दीर्घ रजेनंतर शांत झाले. नगराध्यक्षांनी वैद्यकीय रजेचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांकडे ९० दिवसांच्या सुटीचा अर्ज दाखल केला. त्यावर जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी साकोली नगरपरिषदेचा प्रभार उपाध्यक्षांकडे सोपविण्याचे निर्देश देत नगराध्यक्षांचा दीर्घ सुटीचा अर्ज मंजूर केला. एखाद्या नगराध्यक्षाने दीर्घ सुटीवर जाण्याचा भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार असावा. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने अविश्वासाऐवजी नगराध्यक्ष दीर्घ रजेवर जाणार असे वृत्त प्रकाशित केले होते.साकोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्याविरुद्ध सर्व नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाची तयारी चालविली होती. नगराध्यक्ष धनवंता राऊत विषय समिती सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. अधिकाऱ्याशी संगनमत करून साहित्य खरेदी करतात. एकतर्फी निर्णय घेतात असे आरोप केले होते. त्यावरून सर्व नगरसेवकांनी एल्गार पुकारत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्धार केला. सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यासाठी अविश्वास प्रस्ताव तयारही केला. त्यावर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. अविश्वासाची तयारी पूर्ण करण्यात आली होती.मात्र याची माहिती भाजपच्या वरिष्ठांना होताच त्यांनी सर्व नगरसेवकांची साकोलीत बैठक बोलाविली. आमदार बाळा काशीवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत चर्चा होऊन नगराध्यक्षांना नमते घेण्याचा सल्ला घेण्यात आला. त्यानुसार त्यांना दीर्घ रजेवर जाण्यास सांगण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशान्वये २७ फेब्रुवारी रोजी धनवंता राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर केला. त्यात वैद्यकीय कारणावरून ९० दिवस सुटी हवी असल्याचे म्हटले. या अर्जाची प्रत मुख्याधिकारी आणि उपाध्यक्ष जगन उईके यांनाही देण्यात आली. यासाठी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ५७ चा आधार घेतला. अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी मंजूर केला.उपाध्यक्ष जगन उईके यांच्याकडे प्रभारसाकोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दीर्घ रजेवर गेल्यानंतर नगरपरिषद उपाध्यक्ष जगन उईके यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभार देण्यात आला. नगराध्यक्षांनी रजेचा अर्ज दिल्यानंतर पाच दिवसानंतर उपाध्यक्षांना प्रभाव देण्यात यावा असे कळविले. त्यानुसार मंगळवारी उईके यांनी प्रभार स्वीकारला.पाच दिवस नगरपरिषद वाऱ्यावर४नगराध्यक्षांनी २७ फेब्रुवारी रोजी सुटीचा अर्ज दिला होता. तेव्हापासून नगरपरिषद वाऱ्यावर होती. जबाबदार पदाधिकारी म्हणून कुणाचेही नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यामुळे नगरपरिषदेत कामासाठी येणाºयांना परत जावे लागले.
साकोलीच्या नगराध्यक्ष दीर्घ रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 5:00 AM
साकोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्याविरुद्ध सर्व नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाची तयारी चालविली होती. नगराध्यक्ष धनवंता राऊत विषय समिती सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. अधिकाऱ्याशी संगनमत करून साहित्य खरेदी करतात. एकतर्फी निर्णय घेतात असे आरोप केले होते. त्यावरून सर्व नगरसेवकांनी एल्गार पुकारत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्धार केला. सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यासाठी अविश्वास प्रस्ताव तयारही केला. त्यावर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. अविश्वासाची तयारी पूर्ण करण्यात आली होती.
ठळक मुद्देवैद्यकीय कारण : अविश्वास ठरावावरुन उठलेले वादळ शांत