- ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अकरा चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडानंतर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे रुपडे पालटले असून अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रिक दुरुस्ती आणि नवजात शिशू कक्ष उभरण्यासाठी साडेतीन काेटींचा निधी प्राप्त झाला. ‘लाेकमत’ने सुरुवातीपासूनच घेतलेल्या आक्रमक भूमिकेने निधी उपलब्ध होण्यास मदत झाली. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने कामात अडथळा आणल्याने वर्षभरानंतरही नवजात शिशू कक्ष सुरू झालेला नाही.
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी २०२१ राेजी पहाटे आग लागली. यात दहा बालकांचा हाेरपळून मृत्यू झाला तर एका बालकाचा घटनेनंतर २१ दिवसांनी मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर रुग्णालयातील आराेग्य यंत्रणेत कमालीची सुधारणा झाली. ‘लाेकमत’नेही याबाबत आक्रमक भूमिका घेत आराेग्य यंत्रणा सुधारण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. आग लागल्यास तापमानाने पाईपमधील पॉईंट वितळून पाण्याच्या मारा सुरू हाेईल.
असा झाला बदलnअग्निशमन यंत्रणेसाठी १.९२ कोटी निधीnफायर हायड्रन्ट, अग्निशमन यंत्रणा कार्यरतnवीज दुरुस्तीसाठी ४० लाख nनवजात शिशू कक्षासाठी एक काेटींच्या निधीतून यंत्रांची खरेदीn३६ इनक्युबेटर दाखल, कक्षाचे काम आता अंतिम टप्यात
आमचे बाळ हिरावले पण...वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीत आमचे चिमुकले डाेळ्यादेखत हिरावले. या घटनेतील दाेषींवर कारवाईही हाेईल. मात्र पुन्हा अशी घटना कुठेच घडू नये अशी खबरदारी घ्यावी, असे या अग्निकांडात आपल्या काळजाचा तुकडा हरविलेल्या मातांनी शासनाला आर्त हाक दिली आहे.
परिचारिकांवर आराेपपत्र दाखलअग्निकांडाला दाेषी धरून परिचारिका स्मिता आंबिलढुके आणि शुभांगी साठवणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. परिचारिका जामिनावर असून दीड महिन्यांपूर्वी न्यायालयात आराेपपत्र दाखल झाले. तर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाेद खंडाते यांना निलंबित केले हाेते.