शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

जनधनच्या खात्यातून ग्राहकांची लूट

By admin | Published: April 12, 2016 12:39 AM

जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत.

योजनेला हरताळ : खात्यात हजार रुपये शिल्लक ठेवण्याची बँकांकडून सक्तीराहुल भुतांगे  तुमसर जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती बँकाद्वारे ग्राहकावर करीत आहेत. तसे न केल्यास थेट त्यांच्या खात्यातून दंडाची रक्कम कापल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जनधन योजनेलाच बँकांकडून हरताळ फासला जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची आर्थिक लुट होत आहे.समाजातील वंचित घटकातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना आणली. या योजनेंतर्गत झिरो बॅलन्सद्वारे नागरिकांचे बँकांमध्ये खाते उघडण्यात आले. मात्र हेच खाते आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण सरकारी बँकाच्या नियमानुसार या खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवण्याची सक्ती केली जात आहे. तसेच जे कोणी नागरिक या नियमांचे पालन करणार नाही त्याच्या खात्यातून दंडाच्या नावाखाली सबसिडीची रक्कम हडप केली जात आहे. परिणामी नागरिकांची परिस्थिती बँकेत खाते असूनही इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या गॅससह विविध प्रकारच्या सबसीडी सरकार थेट बँक खात्यावर जमा करीत आहेत. मात्र खात्यामध्ये एक हजार रुपये बॅलन्स ठेवल्या जात नसल्याच्या नावाखाली सबसिडीची रक्कम दंड म्हणून बँका परस्पर वळत्या करीत आहेत. मुळातच जनधन योजनेच्या खात्याचा मुळ हेतू हा झिरो बॅलन्स आहे. खात्यातील बॅलन्सबाबत कोणावरही सक्ती केली जावू नये असे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. परंतु बँकांनी या आदेशालाच केराची टोपली दाखविल्याने ग्राहकांच्या हक्काच्या सबसीडीच्या रकमेवर पाणी सोडावे लागत आहे. जनधन योजनेत उघडण्यात आलेली खाती ही मुळातच वंचित घटकातील नागरिकांची आहेत. रोहयोवर कामे करणाऱ्यांची आहेत. त्यामुळे आधीच विविध कारणांनी पिचलेल्या या नागरिकांना बँकाकडून अरेरावीची भाषा वापरली जात आहे. त्यामुळेही हे नागरिक बँकामध्ये जाण्यास घाबरत आहेत. त्याचाच गैरफायदा बँका व्याज, खात्यावरील देवघेवीची प्रक्रिया शुल्क म्हणून कापून घेत आहेत. एकीकडे नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावतानाच त्यांना समाजाच्या बरोबर आणण्याचे महत्वपूर्ण कार्य बँकाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र बँका नियमावर बोट ठेवून सरकारसह नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या नागरिकांना सरकार न्याय देणार काय, असा प्रश्न आहे.