संजय साठवणे साकोलीसाकोली तालुक्यात काल अचानक आलेल्या गारपीट, वादळवाऱ्यासह पावसामुळे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून महसूल विभागामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत मिळेल किंवा नाही याची माहिती अधिकारीही देत नाही. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.साकोली तालुक्यात दुपारी गारपीटीसह वादळवारा व पावसाला सुरुवात झाली. हे वादळ एवढे वेगाचे होते की यात अनेक झाडे पडली. त्याचप्रमाणे घरावरची कवेलू, टिनाचे छत पूर्णपणे उडाली. एवढेच नाही तर घरांच्या भिंतीसुद्धा जमीनदोस्त झाल्या. फुटपाथ दुकानदारांची संपूर्ण दुकाने जमीनदोस्त झाली. या संपूर्ण परिस्थितीचा आज तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सर्वेक्षण केले. यात संपूर्ण तालुक्यात एकूण दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. वादळवाऱ्यासह पावसाने व गारपीडीने तालुक्यात अनेक घराची व फुटपाथ दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण झाले असून हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवू. शासनाकडून आर्थिक मदत आल्यास ते नुकसानग्रस्तांना देवू.- ए.डब्ल्यू. खडतकरतहसीलदार
१० लाखांचे नुकसान
By admin | Published: May 29, 2016 12:39 AM