आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करा : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतुमसर : खरीप हंगामातील हलके धान निघाले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाने धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत केंद्रावरील दर निश्चितीपेक्षा कमी दराने विक्रीला काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये प्रमाणे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.तालुक्यातल्या काही भागात कोरडाच दुष्काळ पडल्याने आधिच त्यांचे कंबरडे मोडले गेले आहेत तर तालुक्यातल्या बहुतांश भागात सिंचनाची सुविधा असल्यामुळे त्यांनी कशीबशी धानाची शेती लावली मात्र पाऊसाने त्यांनाही चांगलाच दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. मात्र सुदैवाने शेतकऱ्यांना या खरीप हंगामात हलके स्वरुपाचे धानाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांने शेतातील हलके धान कटाई सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या युती शासनाने धान आधारभूत केंद्रावर प्रती क्विंटल १४७० रुपये दर निश्चित केले व बोनस २५० रुपये जाहिर केला. परंतू शासनाने अद्यापही धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. तर इकडे दिवाळी सारखा सण आवासुन उभा आहे. त्यामुळे शेतकरी हा पैसे उभारणीकरिता नाईलाजास्तव निघालेले हलके धान हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभुत किंमतीपेक्षा कवडीमोल भावात विक्री करताना दिसत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ेय दलाल व व्यापाऱ्यामार्फत धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची गरज ओळखून त्या शेतकऱ्यांकडून हजार रुपये ११०० रुपये तर कधी ९०० रुपये प्रति क्विंटल धान खरेदी केलया जात असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. हेच हलके धान जर आधारभूत केंद्रावर दिले असते तर शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये मिळाले असते या उपर बोनस ही मिळाला असता तो वेगळा तुमसरातल्या बहुतांश आधारभूत केंद्राच्या एजेन्सी तसेच विविध कार्यकारी सोसायटी ह्या घोट्याळात अडकले आहेत. त्यामुळे तिथे आधारभुत केंद्र सुरु करणे शक्य नाही. पंरतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच जर धान आधारभूत केंद्र सुरु केल्यास शेतकरी आधारभूत केंद्रावर जमा करेल व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागणार नाही. करिता शासनाच्या लोकप्रतिनिधीने काळाची गरज ओळखून तत्काळ आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
क्विंटलमागे ३०० रूपयांचा तोटा
By admin | Published: October 14, 2015 12:42 AM