लाखनी तालुक्याला गारपिटीने चांगला तडाखा दिला. दिवसभर मोको वातावरण असताना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत लाखनी तालुक्यात ८३५ हेक्टरचे नुकसानीचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल देण्यात आला आहे. यात प्रशासनाच्या वतीने ३३ टक्क्यांच्या आत ४०७ हेक्टर, ३३ टक्क्यांच्या वर ४२७ हेक्टर नोंदविण्यात आली. १०४३ शेतकरी संख्या आहे. पालांदूर मंडळ अंतर्गत उन्हाळी धानाचे लागवडीतील ४५८ हेक्टर नुकसान दाखविण्यात आले. यात ३३ टक्क्यांच्यावर २५१ हेक्टर दाखविले आहे. यात ५०१ शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. भाजीपाल्याचे १० हेक्टरचे नुकसानात २२ शेतकरी, मूग २ हेक्टरचे नुकसानीत सहा शेतकरी प्रभावित झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पालांदूर मंडळांतर्गत ३४ गावांतील शेतीचे गारपिटीने नुकसान झाले असून, तत्काळ नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
पालांदूर मंडळ अंतर्गत धान पिकाचे ४५८ हेक्टरचे पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:35 AM