लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्यभर महाजनादेश यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा शनिवार ३ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. भंडारा व तुमसर येथे सभेचे आयोजन केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला नाशिक येथून १ आॅगस्ट रोजी प्रारंभ झाला आहे. ही महाजनादेश यात्रा ३ आॅगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यात येत आहे. जिल्ह्यात जवाहरनगर येथे आगमन होताच त्या ठिकाणी या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी १ वाजता भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित आहे. मोहाडी येथे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. तुमसर शहरात दुपारी ३ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाजनादेश यात्रेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे उपस्थित राहतील.महाजनादेश यात्रेत सहभागी व्हा -वाघमारेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामगिरीचा लेखाजोखा महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचविला जाणार आहे. तुमसर येथे आयोजित सभेला तुमसर व मोहाडी तालुक्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.
महाजनादेश यात्रा शनिवारी जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 1:17 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्यभर महाजनादेश यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा शनिवार ३ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. भंडारा व तुमसर येथे सभेचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : भंडारा व तुमसरमध्ये सभा