लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पोहचलेल्या महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात उत्साह संचारला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या विकास कामांना लोकांनी हात उंचावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पावती दिली तर मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचा अनुशेष दूर करण्याचे आश्वासन दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी भंडारा जिल्ह्यात पोहचली. जिल्ह्यात ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. भंडारा येथील सभा आटोपून ही महाजनादेश यात्रा तुमसरमध्ये पोहचली. त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर विधानसभा मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने जनतेला दिली. आपण स्वत:करिता कॉलेज, उद्योग आणले नाही. सरकारने जो निर्णय घेतला त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी तुमसर मतदार संघात झाली. पुढील काळातही येथील समस्या सोडवू अशी ग्वाही दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून जनादेश मागितला. त्यावेळी हजारो नागरिकांनी हात उंचावून त्यांच्या जनादेशाला समर्थन देत आमदार चरण वाघमारे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार चरण वाघमारे यांच्या कार्यशैलीने प्रभावित झाल्याने हा प्रवेश करण्यात आला.त्यात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, पारबते गुरुजी, डॉ.मधुसुदन गादेवार, मनोज सुखानी, महेश पटले, रणधीर फुंडे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. यावेळी उर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, म्हाडा सभापती तारिक कुरैशी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे आदी उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात संचारले चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 10:40 PM
पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पोहचलेल्या महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात उत्साह संचारला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या विकास कामांना लोकांनी हात उंचावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पावती दिली तर मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचा अनुशेष दूर करण्याचे आश्वासन दिले.
ठळक मुद्देअनेकांचा भाजपात प्रवेश : विकासाचा अनुशेष दूर करण्याची ग्वाही