Maharashtra Assembly Election 2024 : भंडारा : तिन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारी जाहीर हाेताच वादाचा ‘भंडारा’ जाहीरपणे उधळला जात आहे. भंडारा मतदारसंघात शिंदेसेनेचे नरेंद्र भाेंडेकर यांच्या विराेधात काॅंग्रेसच्या पूजा ठवकर आहेत. येथे भाेंडेकरांना भाजपचा तर ठवकरांना काॅंग्रेसमधील नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. तुमसरमध्ये शरद पवार गटाकडून माजी आ. चरण वाघमारे यांच्या विराेधात रणकंदन आहे. येथे अजित पवार गटाचे राजू कारेमाेरे आहेत. साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे.
कळीचे मुद्देगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन. जमिनीचा अपुरा मोबदला, प्रकल्पबाधितांच्या नोकरीचा प्रश्न. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. औद्योगिक मागासलेपण, बेरोजगारी. एमआयडीसीची दुरवस्था. रखडलेला भेल प्रकल्प. उद्योगांना घरघर. औद्योगिक प्रकल्प आणि विकासात्मक कामांचा अभाव. वैद्यकीय, तसेच उच्च तंत्र शिक्षणाच्या सोयीचा अभाव. वाढती बेरोजगारी.पारंपरिक उद्योग, पितळ व्यवसायाकडे दुर्लक्ष. कारागिरांचे कसब दुर्लक्षित.