लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना साकोली तालुक्यातील विरसी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या इमारतीची मागची खिडकी तोडून आत प्रवेश केला.साकोली तालुक्यातील विरसी येथे महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. रविवारी सकाळी काही नागरिकांना बँकेची खिडकी तोडलेली दिसली. त्यावरुन त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा या बँकेत चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी बँक इमारतीच्या मागच्या बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला. बँकेतील तिजोरी सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहायाने फोडली. तिजोरीतील दोन लाख ६५ हजार ७० रुपये लंपास केल्याचे लक्षात आले. त्यानंतर महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापकही घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. पंरतु माग मिळू शकला नाही. विशेष म्हणजे या चोर्यांनी तिजोरी फोडण्यासाठी आणलेले गॅस सिलिंडर एका शेतात टाकून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणी भांदवी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, सहायक पोलीस निरीक्षक पाण्डे, पोलीस जमादार गोबाडे करीत आहेत.विरसी येथील चोरीत वापरण्यात आलेला गॅस कटर व सिलेंडर हा नागझिरा रोड साकोली येथील भगवान पटले यांच्या गगन ट्रेडर्स येथील असल्याची माहिती आहे. हा गॅस सिलींडर चोरट्यांच्या हाती कशा लगला हा संसोधनाचा विषय आहे.चौकीदारच नाहीमहाराष्ट्र बँकेच्या विरसी येथील शाखेत रात्रपाळीत चौकीदार नसल्याची बाब या चोरीमुळे उघडकीस आली. बँकेसारख्या महत्वाच्या ठिकाणी चौकीदार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र बँकेची तिजोरी फोडून अडीच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:22 PM
गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना साकोली तालुक्यातील विरसी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या इमारतीची मागची खिडकी तोडून आत प्रवेश केला.
ठळक मुद्देविरसी येथील घटना : चोरट्यांनी इमारतीची खिडकी तोडून गॅस कटरने फोडली तिजोरी