लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / तुमसर : दसरा मेळाव्याच्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी केल्याचा प्रत्यय मंगळवारी जिल्ह्यात आला. दसऱ्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनी केला. तुमसरमध्ये प्रत्येक पक्षाने मंडप उभारला, तर लाखनीत प्रमुख उमेदवार एकाच मंचावर आले. दसरा मेळाव्यातील हजारोंची गर्दी कॅश करण्याचा यानिमित्ताने प्रयत्न झाला.भंडारा येथील दसरा मैदान आणि रेल्वे मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी अप्रत्यक्ष प्रचार केला. मेळाव्याला दोन्ही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. सार्वजनिक उत्सवाला सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यातील उपस्थिती हा जनसंपर्काचा प्रमुख मुद्दा होता. लाखनी येथे सावरी, मुरमाडी आणि लाखनी या तीन गावांच्या वतीने उत्सव आयोजित करण्यात आला होता.या उत्सवाला साकोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार परिणय फुके, काँग्रेस उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यासह आमदार बाळा काशीवार, प्रकाश बाळबुद्धे आदी उपस्थित होते. या ठिकाणी कोणत्याही नेत्याने राजकीय भाष्य केले नसले तरी उपस्थितीतून जनतेला जो संदेश द्यायचा तो दिला. सृष्टी नेचर क्लब तर्फे समर्थ मैदान कचरामुक्त करण्यात आले. तसेच दसरा उत्सवातून सामाजिक संदेश दिल्याने या क्लबचे तीनही उमेदवारांनी कौतूक केले. पालांदूर येथील दसरा मेळाव्याला भाजप उमेदवार परिणय फुके आणि बाळा काशीवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली.तुमसरमध्ये उमेदवारांचे मंडपतुमसर विधानसभा निवडणुकीने वातावरण ढवळून निघाले आहे. येथे तिहेरी लढतीचे संकेत आहेत. प्रत्येक उमेदवार विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यातही उमेदवारांनी आपला प्रचार केला.बहुतांश सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी दसरा मेळावा परिसरात मंडप उभारले होते. त्यात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि बसपाच्या उमेदवाराचा समावेश होता. उमेदवारांसह प्रमुख पदाधिकारी या मंडपात उपस्थित होते. मंडपातील ध्वनीक्षेपकावरून आपल्या उमेदवाराची महती सांगितली जात होती.या मेळाव्याला सुमारे १५ ते २० हजार नागरिकांची गर्दी होती. देखणे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजीही झाली. फटाक्यांच्या आतषबाीपेक्षा ध्वनीक्षेपकावरून राजकीय आतषबाजीच जास्त ऐकायला येत होती.राजकीय फटाकेबाजीयावर्षीचा दसरा मेळावा राजकीय फटाकेबाजीने तुमसरमध्ये साजरा करण्यात आला. राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थिती या मेळाव्याचे वैशिष्ट्ये होते. मेळाव्यात कुणाच्या मंडपात अधिक गर्दी झाली याची चर्चा होती. कोण उपस्थित आहे यावरही नागरिक चर्चा करताना दिसत होते. राजकीय फटाकेबाजीत तुमसरचा मेळावा उत्साहात पार पडला.
Maharashtra Election 2019 ; दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 6:00 AM
भंडारा येथील दसरा मैदान आणि रेल्वे मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी अप्रत्यक्ष प्रचार केला. मेळाव्याला दोन्ही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. सार्वजनिक उत्सवाला सर्वच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यातील उपस्थिती हा जनसंपर्काचा प्रमुख मुद्दा होता.
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : लाखनीत उमेदवार एकाच मंचावर