शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Maharashtra Election 2019 ; निवडणूक अंतिम टप्प्यात गावागावांत प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM

भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. प्रत्येकजण विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष भेटीवर भर : शहरी आणि ग्रामीण भाग निघाला ढवळून

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. १९ ऑक्टोबर रोजी प्रचारतोफा थंडावणार असल्याने गावन्गाव पिंजून काढण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. गावागावांत प्रचाराची रणधुमाळी निर्माण झाली असून निवडणुकीत कोण विजयी होणार याचीच उत्सूकता आणि चर्चा प्रत्येक गावात दिसत आहे.भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. प्रत्येकजण विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. गावागावांत वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून प्रचार केला जात आहे. उमेदवारांच्या रॅली काढून जनतेचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेत्यांच्या सभा आयोजित करून आपल्या उमेदवारीचे समर्थन केले जात आहे.भंडारा विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार उभे असून त्यात महायुती, आघाडी, हिंजप, बमुपा, वंचित बहुजन आघाडी, बसपा यासह अपक्षांचा समावेश आहे. भंडारा मतदार संघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी येथे अपक्षांचा बोलबाला दिसत आहे. कवाडे गटाचे जयदीप कवाडे, आठवले गटाचे अरविंद भालाधरे अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. या दोघांपुढे अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. इतर अकरा उमेदवारही मतदार संघात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन आपली भूमिका सांगत आहेत. तुमसर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार असून येथे भाजप, राष्ट्रवादी, बमुपा, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तिकीट नाकारल्याने भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी बंडखोरी केल्याने येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, भाजपचे प्रदीप पडोळे अशी ही लढत होत आहे.साकोली विधानसभा मतदार संघात १६ उमेदवार रिंगणात असून भाजप, काँग्रेस, बसपा, बळीराजा पार्टी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, जय महाभारत पार्टी, बहुजन वंचित आघाडी, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया यासह अपक्ष रिंगणात आहेत. पालकमंत्री डॉ.परिणय फुके भाजपकडून तर नाना पटोले काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत.हेवीवेट लढतीत काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. प्रचाराची सर्वाधिक रणधुमाळी साकोली मतदारसंघातील साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यात दिसत आहे.निवडणुकीने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची प्रचार रॅली काढली जाते. उमेदवार मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. मात्र ग्रामीण भागातील जनतेच्या मनात काय आहे याचा अद्यापही अंदाज येत नाही.निवडणुकीसाठी ६ हजार ३० मनुष्यबळजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी ६ हजार ३० मनुष्यबळ लागणार आहेत. त्यात मतदान केंद्राध्यक्ष १५०८, प्रथम मतदान अधिकारी १५०८ आणि इतर मतदान अधिकारी ३ हजार १५ यांचा समावेश आहे. यासोबतच सखी मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.जिल्ह्यात ९ लाख ९० हजार मतदारभंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात ९ लाख ९० हजार ६६५ मतदार आहेत. त्यात पुरुष ४ लाख ९८ हजार ८२४, महिला ४ लाख ९१ हजार ८४१ मतदारांचा समावेश आहे. तुमसर मतदार संघात ३ लाख १ हजार ७३० मतदारांमध्ये पुरुष १ लाख ५२ हजार ७७९, महिला १ लाख ४८ हजार ९५१ मतदार आहेत. भंडारा मतदार संघात ३ लाख ७० हजार ६९० मतदार असून त्यात पुरुष १ लाख ८५ हजार २१६ तर महिला १ लाख ८५ हजार ४७४ मतदार आहेत. साकोली मतदारसंघात ३ लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यात १ लाख ६० हजार ८२९ पुरुष आणि १ लाख ५७ हजार ४१६ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.जिल्ह्यात कुठेही रोकड पकडली नाहीविधानसभा निवडणुकीदरम्यान तीन ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत कोणत्याही ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली नाही. तसेच कुणावर आचारसंहिता भंगाचाही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पोलीस मात्र रात्रंदिवस गस्त घालत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा