लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : माझी जन्मभूमी नागपूर आहे. परंतु ज्या दिवसापासून मी भंडारा-गोंदिया विधानपरिषदेचा आमदार झालो त्या दिवसापासून माझी कर्मभूमी हे दोन्ही जिल्हे आहे. निवडून आल्यावर मी कायमस्वरुपी साकोली मतदारसंघात राहणार असून विकास - रोजगार हेच माझे ध्येय आहे, अशी ग्वाही साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार डॉ.परिणय फुके यांनी दिली.लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपुरात जनता दरबार घेतो. या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये तीन विभागाचा राज्यमंत्री आहे. आता आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. माझी हीच कर्मभूमी असून आपणच मला ओळख दिली असे डॉ.फुके म्हणाले.सभेला आमदार बाळा काशीवार, प्रकाश बाळबुद्धे, शेषराव वंजारी, सालेभाटाच्या सरपंच पुष्पलता सोनवाने, प्रदीप राहांगडाले, राजू बांते, हेमचंद्र बोपचे, सदाशिव राहांगडाले, शिवदत्त राहांगडाले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Maharashtra Election 2019 : हीच माझी कर्मभूमी, विकास रोजगार हेच माझे ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:00 AM
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपुरात जनता दरबार घेतो. या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये तीन विभागाचा राज्यमंत्री आहे. आता आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. माझी हीच कर्मभूमी असून आपणच मला ओळख दिली असे डॉ.फुके म्हणाले.
ठळक मुद्देपरिणय फुके : लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा