लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असून उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहेत. तुमसर, भंडारा, साकोली या तीनही ठिकाणी अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. बंडखोरांचे आव्हान कायम असल्याने निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.भंडारा विधानसभेची जागा आघाडीने पीरिपा (कवाडे) व युतीने रिपाइं (आठवले) गटाला सोडल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, या निवडणुकीवरुन त्यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही. उमेदवारांच्या प्रचारातही त्यांचा सहभाग नसल्यासारखा जाणवत आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढत असल्याने युती आणि आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनीसुद्धा बंड पुकारून भाजप उमेदवाराला आव्हान दिले आहे. याठिकाणी जातींचे मतविभाजन होणे निश्चित असल्याने ऐनवेळी कोणत्या उमेदवाराला त्याचा लाभ मिळेल, हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतच लढत असल्याचे चित्र आहे.भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी साकोली येथे सभा घेतली. या सभेने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेस माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत बहुजन वंचित कडून निवडणूक रिंगणात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. काँग्रेसकडूनही याठिकाणी स्टार प्रचारक आणले जाणार आहेत. तथापि, तीनही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या प्रचार सभा सुरू असल्याने कोण विजयी होणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.प्रचाराला उरले केवळ चार दिवसभंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्याला वेग आला आहे. प्रत्यक उमेदवार गावागावांत जावून मतांचा जोगवा मागत आहे. सर्वांपेक्षा आम्हीच श्रेष्ठ, असे दाखवून मतदारांना आकर्षित करीत आहेत. आता प्रचाराला केवळ चार दिवस उरले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे चाहते तसेच कुटुंबिय गावे पिंजून काढीत आहेत. सभा, रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. बहुतांश गावांमध्ये मोठे उमेदवारांच्या नावाचे व चिन्हाचे फलक झळकत आहे. येत्या चार दिवसात जिल्ह्यात स्टॉर प्रचारकांची रेलचेल दिसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Election 2019 ; प्रतिष्ठेच्या लढतीत कोण मारणार बाजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतच लढत असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देबंडखोरांचे आव्हान कायम : तुमसर, भंडारा, साकोलीत लढत अटीतटीची