मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूकीत सुरक्षेच्या दुष्टीने तपासणी केंद्र उभारून प्रत्येकांवर पोलिसांची करडी नजर असते. आंतरराज्यीय सीमेवर तर पोलीस डोळ्यात तेल घालून पाहरा देत असतात. जिल्ह्यातील महाराष्ट्र- मध्यप्रदेशाची सीमा लवकरच सील होणार असून तुमसर तालुक्याच्या बपेरा व नाकाडोंगरी सीमेवर पोलिसांचा खडा पाहरा राहणार आहे.भंडारा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला मध्यप्रदेशाची सीमा आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी गावापासून मध्यप्रदेश राज्याची हद्द सुरू होते. तुमसर उपविभाग हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. दारू तस्करी, रेतीची चोरटी वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक याच आंतरराज्यीय सीमेहून होत असते. बावनथडी नदीच्या विशाल पात्राने दोन राज्यांच्या सीमांची विभागणी झाली आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा नक्षल प्रभावित आहे. नदी पात्रात पक्के बांधकाम असलेला पूल असून रहदारीवर कुणाचाही वचक नसतो. सदर आंतरराज्यीय सीमा वाहतुकीसाठी २४ तास खुली राहत असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावते.लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली असताना पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. भंडारा व बालाघाट येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची तपासणी नाक्यासंदर्भात बोलणी झाल्याची माहिती आहे. लवकरच या ठिकाणी दोन्ही जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वतंत्र तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्त ८ ते ११ एप्रिलपर्यंत ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाराष्टÑ व मध्यप्रदेशच्या सीमेवर बंदोबस्ताबाबत एक ते दोन दिवसाय निर्णय होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्यीय सीमा होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:56 PM
भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र- मध्यप्रदेशाची सीमा लवकरच सील होणार असून तुमसर तालुक्याच्या बपेरा व नाकाडोंगरी सीमेवर पोलिसांचा खडा पाहरा राहणार आहे.
ठळक मुद्देभंडारातील बपेरा व नाकाडोंगरी सीमेचा समावेश