दहावी सीबीएसईचा निकाल : मुलांपेक्षा मुलींचीच भरारीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात महर्षी विद्या मंदिर शाळा भंडाराची विद्यार्थिनी पूर्वा कैलाश ईश्वरकर हिने ९८.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. तीला ५०० पैकी ४९४ गुण आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पाच शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे. यावर्षीही निकालात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे.महर्षी विद्या मंदिर भंडारा भंडारा : निकालाच्या बाबतीत शंभर टक्के यशस्वी ठरलेल्या महर्षी विद्या मंदिर शाळा भंडारा येथील मिहीर केशव चकोले याने द्वितीय क्रमांक (९८.४० टक्के) प्राप्त केला. तृतीय क्रमांक संयुक्तपणे धनश्री कावळे व तुषार टिकाम व तुमसर येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतील धनंजय इखार याने प्राप्त केला. तिघांनाही ९८.२० टक्के गुण मिळाले आहेत. या शाळेतून परिक्षा दिलेल्या २६७ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. यापैकी ७० विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए रँक म्हणजेच ९० टक्यापेंक्षा जास्त गुण मिळविले आहेत. सनीज स्प्रिंग डेल भंडाराभंडारा : शहरातील सनीज स्प्रिंग डेल शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. शाळेतून परिक्षा दिलेल्या १०० विद्यार्थी उर्तीर्ण झाले. यापैकी रिंकु गभणे या विद्यार्थीनीने ९७.८० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. राधिका बगमारे, मोहित निरगुलकर व खुशबू शहारे यांनी संयुक्तपणे द्वितीय स्थान प्राप्त केले. या तिघांनाही ९७ टक्के गुण मिळाले. तृतीय क्रमांक सुरूचि वलथेर (९५.८०) हीने प्राप्त केला. वीस विद्यार्थ्यांनी १०सीजीपीए रँक प्राप्त केले.केंद्रीय विद्यालय जवाहरनगरजवाहरनगर : केंद्रीय विद्यालय जवाहरनगर येथील तेजश्री नारायण अगस्ती हीने ९५.२० टक्के गुण घेवून विद्यालयातून प्रथम आली. द्वितीय क्रमांक पुजा सातपुते (९३.४०), तृतीय क्रमांक श्रृती गोन्नाडे या विद्यार्थीनीने पटकाविला. पाच विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए रँक प्रप्त केली आहे. रॉयल पब्लिक स्कूल, भंडारा भंडारा : येथील रॉयल पब्लिक शाळेतून प्रथम येण्याचा मान काजल रामटेके हिने प्राप्त केला. तिला ९७.६० टक्के गुण मिळाले. तसेच चिन्मय शेंदरे व साक्षी सेलोटे यांनी संयुक्तपणे(९५.४०टक्के) द्वितीय स्थान प्राप्त केले. तिसऱ्यास्थानी अक्षरा मॅथ्यु हिने ९५.२ टक्के गुण घेतले. सेंट पीटर शाळा भंडाराचा विद्यार्थी आयुष गजभिये याने ९७ टक्ेक गुण मिळविले.युएसए विद्यानिकेतन तुमसरतुमसर : या शाळेतील १५ विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए रँक केले. यात यशिका जिभकाटे, पूर्वा पांडे, विदित तांबी आदींनी यश प्राप्त केले. महर्षी विद्या मंदिर तुमसर तुमसर : या शाळेतील धनंजय जयपाल ईखार या विद्यार्थ्याने ९८.२० टक्के गुण घेवून तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला.शंभर टक्के निकालाच्या शाळा४जिल्ह्यातील नऊ सीबीएसई शाळेतून ८४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात महर्ष विद्या मंदिर भंडारा, सनीज स्प्रिंग डेल शाळा भंडारा, केंद्रीय विद्यालय जवाहरनगर, महर्षी विद्या मंदिर तुमसर, युएसए विद्यानिकेतन तुमसर या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
महर्षीची ‘पूर्वा’ जिल्ह्यात अव्वल
By admin | Published: June 04, 2017 12:13 AM