लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा स्थित असणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाचा थकबाकीमुळे महावितरण मार्फत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शनिवारला दुपारी ही कारवाई करण्यात आली असून केंद्र शासनाचे विभागाला महाविरणचा धक्का असल्याचा सुर परिसरात आहे.सिहोरा स्थित बस स्थानकाचे शेजारी भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय आहे. या कार्यालयातून सिहोरा, सिलेगाव आणि देवसर्रा गावात असणारे कार्यालय संचालित करण्यात येत आहे. या शिवाय शासकीय कार्यालयात बँक सेवा भारत संचार निगमला जोडण्यात आली.यामुळे कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करताच संलग्नीत कार्यालयात असणारी इंटरनेट सेवा बंद झाली आहे. या कार्यालयाकडे दोन महिन्याचे सहा हजार रूपये विजेचे थकीत असल्याचे कारणावरून शनिवारला दुपारी ३ वाजता वीज वितरण कंपनी मार्फत विज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान इंटरनेट सेवा अडचणीत आल्याने सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. कार्यालयात कामे होत नसल्याने आल्या पावली परत जाण्याची पाळी आली आहे.केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालयाची विज पुरवठा खंडीत करण्याची ही परिसरात पहिलीच कारवाई आहे. यामुळे एका विभागाचा दुसºया विभागाने वीज पुरवठा खंडीत केल्याने नागरिकांत उत्सुकता आहेत. दरम्यान शनिवार पासून विज पुरवठा खंडीत असताना आज बुधवारपर्यंत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. तब्बल पाच दिवसापासून कार्यालयात अंधाराचे साम्राज्य आहे. या कार्यालयात वीज पुरवठा बंद असल्याने कार्यरत कर्मचारी टेंशन घेण्याचे स्थितीत नाही. कार्यालयाचे दरवाज्याला कुलूप दिसत आहे. या कार्यालयात टेलीफोन मॅकॅनिक असे एक पट कार्यरत असून अन्य कार्यालयात सिहोरा येथून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. या कार्यालयाचे सिलेगाव, हरदोली आणि देवसर्रा गावात असणारे टॅक्टर बंद झाली आहेत. केंद्र शासनाचे विभागाला विज वितरण कंपनीने मोठा शॉक दिला आहे.भारत संचार निगम कार्यालयाचे विज देयक मुंबईच्या कार्यालयातून देयक करण्यात येत आहे. यामुळे विज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यास विलंब लागत असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात कार्यालयात कार्यरत टेलीफोन तांत्रिक कामगार बाबुलाल बिसने यांना संपर्क साधले असता होऊ शकले नाही.भारत संचार निगम लिमिटेड सिहोरा स्थित कार्यालयाचा विज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने परिसरातील बीएसएनएल सेवा बंद झाली असून सामान्य नागरिक त्रस्त आहेत.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी.
दुरसंचार निगम कार्यालयाला महावितरणचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 10:10 PM
सिहोरा स्थित असणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाचा थकबाकीमुळे महावितरण मार्फत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शनिवारला दुपारी ही कारवाई करण्यात आली असून केंद्र शासनाचे विभागाला महाविरणचा धक्का असल्याचा सुर परिसरात आहे.
ठळक मुद्देवीज पुरवठा खंडित : कार्यालयाचे कामकाज प्रभावित