मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत. मुख्य कालवा दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन शेती पिकांना मोठा धोका येथे निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या संयुक्त बावनथडी नदीवर बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाची उभारणी ४३ वर्षापुर्वी सुरु करण्यात आली होती. सध्या एकुण १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सदर प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष सन १९७५ मध्ये धरण बांधकामाचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या बावनथडी धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळेच तालुक्यातील नागरिकांची तृष्णा भागविणे सुरु आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता सदर प्रकल्प वरदान ठरला आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्यातील ७७ गावांना सिंचनाचा लाभ मिळत आहे.बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. धरण बांधकामादरम्यान मुख्य कालवा बांधकाम व त्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते. सदर कामांना सुमारे २० ते २२ वर्षांचा काळ लोटला. मुख्य कालव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय व धोक्याची शक्यता अधिक आहे. मुख्य कालव्यातुन लहान कालवे व वितरिकेद्वारे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सध्या प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.प्रकल्पाची देखभाल आवश्यकफुटलेल्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देऊन दुरुस्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही धरणाचे आयुष्य हे शंभर वर्षाचे असते. धरणात दरवर्षी गाळ साचते. त्यामुळे धरण हळूहळू भरते असे शास्त्रीय कारण असल्याची माहिती आहे. याधरणावर कोट्यवधींचा खर्च आतापर्यंत करण्यात आला..
बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:52 AM
आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत.
ठळक मुद्देदुरुस्तीची गरज । मुख्य कालव्याची लांबी २६ किमी, तुमसर-मोहाडीकरिता वरदान