मोयन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसामुळे खड्यात पाणी भरल्यानंतर खड्डा दिसेनासा होतो. यावेळी अपघाताची शक्यता अधिक आहे. मुख्य रस्त्याची अक्षरक्ष: येथे चाळण झाली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करतो हे विशेष.तुमसर शहरातील नविन बसस्थानकापासून तर जुन्या बसस्थानकापर्यंत सुमारे एक ते सव्वा किमी चा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. एक ते दीड फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले आहेत.हा रस्ता आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. जड वाहनांची वाहतूक याच रस्त्याने सुरु आहे. रेतीचे ट्रक येथूनच जातात. शहरात हाच रस्त्याने प्रवेश केला जातो. शहराचा हा प्रमुख प्रवेश मार्ग आहे. रस्त्यावर दूभाजक आहे. सुरक्षेचा दृष्टीने दूभाजक नक्की तयार केला आहे; परंतु रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन खड्डे वाचवितांनी दूभाजक येथे अडसर ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध महाकाय खड्डयांनी रस्ता व्यापल्याने वाहने कुठून न्यायची असा प्रश्न वाहनधारकांना येथे पडला आहे.शहराची अर्धी लोकसंख्या श्रीरामनगर विनोबा भावे नगर, इंदिरा नगरात राहते, बसस्थानक बँंका, रुग्णालये याच मार्गावर असल्याने अतिशय वर्दळ या रस्त्यावर असते. मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणात हा रस्ता आहे. शहर तुमसर असून मोहाडीच्या नियंत्रणात सदर रस्ता असल्याने सुमारे १५ कि.मी. अंतरावरुन अधिकाऱ्यांना दृष्टी टाकावी लागते. मागील ५० वर्षापासून रस्त्याची मालकी अजूनपर्यंत बदलली नाही.येथे तांत्रिक अडचण पुढे केली जात आहे. चार दिवसापूर्वी जुन्या बसस्थानक परिसरातील मोठ्याा खड्डयात मुरुम घालण्यात आले. त्या मुरुमाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. काही वर्षापूर्वीच सदर रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्याची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की क्षमतेपेक्षा जड वाहतूकीमुळे रस्ता खड्डेमय बनला हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.उन्हाळा गेला, पुढे पावसाळा आहे हे माहित असतांना, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरचे खड्डे बुजविले नाही. शासनाने मजूरी दिली नाही काय? की वेळेपूर्वीच रस्त्यावर खड्डयांची मालीका सुरु झाली हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. जीव धोक्यात घालून मुकाट्याने प्रवास करणे येथे मात्र सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे ढिगभर पदाधिकारी शहरात वास्तव्याला आहेत, पंरतु कुणीच शब्द काढायला तयार नाही. धृतराष्ट्राची भूमिका वठविण्यात धन्यता मानीत आहेत.एखाद्या अपघातानंतर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिक्षा तर नाही ना असा प्रश्न येथे उपस्थीत होत आहे.
तुमसरातील मुख्य रस्ता जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:48 PM
कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे.
ठळक मुद्देदुर्लक्ष : बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह