शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:38 PM

नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांची सभा : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सभेत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कोल्हे बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, विज्ञान पर्यवेक्षक शत्रुघ्न कोडवती, शिक्षण विस्तार अधिकारी देवेंद्र शेंडे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. मुख्याध्यापकांनी वेळेवर काम सोयीस्कर करावे यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.दुसºया दिवशी साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची तर पहिल्या दिवशी मोहाडी, तुमसर व भंडारा येथील तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा पार पडली.या सभेत मानव विकास योजना, शाळा सिद्धी, परिवहन समिती, सुरक्षा समिती, मुल्यशिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, शालेय स्वच्छता, ग्रंथालय उपयोग, प्रयोगशाळा, शाळेच्या कर्मचाऱ्यांचे रोष्टर, लेखा परिक्षण, वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती, वेतनपथक संबंधी समस्या, वृक्षारोपण आदी विषयावर चर्चा व माहिती देण्यात आली. अजुनही २६ शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनेत्तर अनुदान शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात पडून आहे. जुलै अखेरपर्यंत मुख्याध्यापकांनी असिसमेंट करावे. ७ तारखेपर्यंत वेतन बिल पाठवा १ तारखेला वेतन बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी आमची असेही शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी सांगितले.शाळाच्या संच मान्यतेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तात्काळ दाखल करा, २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती विभागाला कळवा, मुख्याध्यापकांच्या जागा ज्या शाळेत रिक्त आहेत तिथे पदोन्नती घ्या, प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवा लवकरच वैद्यकीय मान्यता दिली जाईल.८० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांनी शाळा सिद्धी माहिती भरा, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी लावा, शाळांनी एनटीएस, एनएमएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा यात मोठा सहभाग नोंदवावा, प्रोत्साहन भत्ताची प्रकरणे निकाली काढता येण्यासाठी प्रस्ताव काळजीने पाठवा अशा सुचना सभेत देण्यात आल्या.वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ आहे. यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा अशा सुचना शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी दिली. मुख्याध्यापकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी दररोज व्यायाम व योगा करावे तेच शिस्तिचेही पालन करण्याचा सल्ला शिक्षणाधिकाºयांनी दिला. विविध योजनेची माहिती शत्रुघ्न कोडवती, प्रदीप गणवीर यांनी दिली.वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावीजुलै महिन्यात मिळणाऱ्या कोणाच्याही वेतनवाढी रोखू नका. वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. वार्षिक वेतनवाढ दिल्याशिवाय वेतन बिल पारित केले जाणार नाहीत.६ ते ८ वर्गासाठी तीन शिक्षकांपैकी जेष्ठ शिक्षकांना माध्यमिक विभागावर दाखविता येईल. माध्यमिक स्तराची वेतन श्रेणी देता येईल. सेवाजेष्ठतासाठी सेवाशर्थी प्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी.