स्वत:हून स्वत:ला वगळतात महिला : लाखनीत रंगले वासंतिक कविसंमेलनलाखनी : कविता हा समाजमनाचा आरसा असतो. त्यात आपले प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. तसेच अंतरातील दु:ख, वेदना, क्रोध, आवेशही आपापली पटले उघडत जातात. अर्थात थोडक्यात सांगायचेच झाल्यास अत्यंत कमी आणि भावगर्भ शब्दात मांडली जाणारी शब्दकृती म्हणजे कविता होय, त्याच कवितांचा सोहळा म्हणजे कविसंमेलन.गुढी पाडव्याचे औचित्य साधून अशाच प्रकारच्या कविसंमेलनाची वि.सा. संघ लाखनीच्या वतीने २९ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ करणारे द.सा. बोरकर आज ह्यात नसले तरी त्यांनी आरंभ केलेल्या परपंरेनुसार स्व. रोकडे यांच्या स्मृतीस समर्पित असलेले कविसंमेलनच्या अध्यक्षस्थानी जयकृष्ण बावनकुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोली साहित्य संमेलनाचे यंदाचे अध्यक्ष नरेश देशमुख, महेश रोकडे व ज्ञा. म. नेवार यांची उपस्थिती लाभली होती. एकापेक्षा एक सरस व भावपूर्ण कवितांनी भावविभोर करणाऱ्या ह्या कविसंमेलनात सामाजिक राजकीय, प्रेम, आत्मकथन व विद्रोही स्वरुपाच्या कविता सादर करण्यात आल्या. ह्यात महिला सक्षमीकरणाच्या काळातही महिलांवर होणारे अत्याचार कुटुंबात व समाजातही होणारी त्यांची हेडसांड आणि दैनंदिन व्यवहारात होणारी त्यांची कुंचबना आपल्या कवितेतून विषद करतानी प्रा. डॉ. अनिल नितनवरे म्हणाले, दळणातही स्वत:ला दळतात बायास्वत:तून स्वत:ला वगळतात बायाझाडही न सोडी पिकल्याशिवाय पानेऐन बहरात अशा गळतात बायास्व विसरलेल्या महिलांच्या या भाव विवश आगनिकतेनंतर कवी राम महाजन, दयाराम बगमारे, दौलत पठान, दिनेश पंचबुद्धे, दुरूगकर, प्रतिक्षा कापगते, प्रा. डॉ. अल्का सोरदे यांच्या कवितांनाही श्रोत्यांनी मनमोकळी दाद दिली तर मृणाल शिवनकरच्या कवीतेने दाद मिळविली. शेतकऱ्यांच्या संघर्षशिल जिवनाची व्यथा प्रसंगी शेतीत राबता, राबताच शेतीत होणारा त्याचा शेवट कथन करून त्याच्या उद्धाराचे कार्य कोणी तरी करायला पाहिजे असा आशावाद व्यक्त केला तोच धागा पकडून मनोज बारसागडे यांची माझा शेतकरी ही कविता व नरेंद्र नागदेवे, निकेत हुमणे, डॉ. हेमकृष्ण कापगते, अस्मिता मेश्राम, सारीका दोनोडे यांच्या कविताही उल्लेखनीय ठरल्या. दाहक सामाजिक वास्तव मांडून समाजाच्या अधपतनास कारणीभूत घटक आणि आपण विसरत चाललेली सामाजिक बांधिलकी यामुळे होणाऱ्या परिणामाला तोंड देण्यासाठी समाजानेच भानावर यायला हवे अशी आशय कविता सादर केली. त्याचप्रमाणे डॉ. हरीश्चंद्र बोरकर, नामदेव कानेकर, संत डोमा कापगते, दिवाकर मोरकर, महेश रोकडे, सुधांशु धकाते यांच्या बहारदार कविता नंतर प्रल्हाद सोनवाने यांनी हिंडतो वेड्यापरी या वैन गंगेच्या तिरी जीव झाला बासरी या वैनगंगेच्या तिरी ही गजल सादर करून नैसर्गीक सामर्थ्याने नटलेले वैनातिर व तेथील समाजमनाचे सांगोपन चित्र चितारले तर तुलसीदास चौधरी यांच्या मला भेटले ते भिकाऱ्या प्रमाणे, तरी वार केले शिकाऱ्याप्रमाणे, जिथे माणसांची अरे कार्यशाळा, तिथे दंभ चाले निखाऱ्याप्रमाणे. या ओळींनी सामाजिक दांभीकतेवर प्रहार करीत सामाजिक वंटपणा व नात्यामधील कटूता समर्थक शब्दात उलगडून दाखिविली. बाबुराव निखाडे यांनी काय सांगू कस सांगू माणसाची व्यथा या आम्ही मानो मुक्तपणे जीवनाची कथा हा या कवितेने श्रोत्यांच्या मणधरणीस कविसंमेलनाचे दडपण थोड हलके केले. अध्यक्ष रामकृष्ण बावनकुळे व संचालन अक्षय मासूरकर व योगेश बोरकर यांनीही याप्रसंगी आपापल्या कविता सादर केल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
‘दळणातही स्वत:ला दळतात बाया’
By admin | Published: April 01, 2017 12:39 AM