तुमसर तालुक्यातील बघेडा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा येथील एका शिक्षक पेशाला काळिमा फासावे असे कृत्य एका शिक्षकांनी केले. त्यांनी पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड केली. २७ जानेवारीला संपूर्ण शाळा सुरू झालेत. तिथला हा नराधम शिक्षक पहिल्या दिवसापासूनच त्या विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केले. तो त्या विद्यार्थिनीला पहिल्या बेंचवर बसवत असूनसुद्धा जाणून बुजून मागील बेंचवर बसवायला लावायचा. दररोज तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून त्रास द्यायचा. या जाचाला कंटाळून त्या विद्यार्थिनीने आईला सर्व प्रकरण सांगितले व तिच्या पालकाने ८ मार्च महिला दिवसला पोलीस ठाणे गोबरवाही येथे शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. पण नंतर ढिवर समाजाची एकजुटता पाहून त्या शिक्षकाविरुद्ध पोस्को बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु अद्यापही त्या शिक्षकाला अटक करण्यात आली नाही. या अन्यायाविरुद्ध ढिवर भटक्या विमुक्त जाती समाज आता एकत्र होऊ लागले आहे. शिष्टमंडळात वंचितचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, तालुका महासचिव कार्तिक तिरपुडे, शहराध्यक्ष सोमेंद्र शहारे, शहर महासचिव शैलेश राऊल, वरिष्ठ मार्गदर्शक नरेंद्र बनसोड, चिमणकर, सर्विन शेंडे, दिगंबर रामटेके, महावीर घोडेस्वार, एकलव्य सेनेचे संजय केवट, संजीव भुरे, दीपक मारबते उपस्थित होते.
त्या नराधमाला कठोर शासन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:31 AM