वरठी : महाराष्ट्राच्या टोकावर असलेला भंडारा जिल्हा हा लोककलेची जननी आहे. जिल्ह्यात मंडई उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील चांगल्या-वाईट प्रवृत्तीवर प्रहार करून थोर पुरुषांच्या गाथा सादर केल्या जातात. कौटुंबिक प्रश्नासह आरोग्य अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाते. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी मंडई उत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले.
वरठी येथील आठवडी बाजारात आयोजित सार्वजनिक मंडई उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्वेता येळणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुमित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल काळे, एकनाथ फेंडर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलिंद धारगावे, गणेश हिंगे, माजी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, रितेश वासनिक, अरविंद येळणे, रूपेश गाढवे, विलास काकडे उपस्थित होते. संचालन माजी सरपंच चांगदेव रघुर्ते, प्रास्ताविक मिलिंद धारगावे व आभार शंकर खंगार यांनी मानले. यावेळी आयोजक कमिटीचे विलासराव देशमुख, एकनाथ बांगरे, प्रसेनजित देशभ्रतार, अरविंद येळणे, चंदू चौधरी, बाळू दमाहे उपस्थित होते.