लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कौटुंबिक वादात पुतण्याने काकाच्या डोक्यावर लोखंडी टीकासच्या दांड्याने मारल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. वर्मी घाव बसल्याने मृत पावला. या हत्याकांडातील आरोपी प्रभू लक्ष्मण शिंदे व अबंर राजू शिंदे (दोन्ही रा. रामपुरी, ता. लाखनी) या दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तथापि प्रभू शिंदे याचे यापूर्वीच निधन झाल्याने त्याला शिक्षेतून कमी केले आहे.
या खुनाच्या प्रकरणी प्रभू शिंदे व अबंर शिंदे यांच्याविरूद्ध कलम ३०२, ३०७, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्ह्याची नोंद पालांदूर ठाण्यात घेण्यात आली होती. कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी सळाख व टीकासचा दांड्याचा वापर गुन्ह्यात केला होता. अगदी क्षुल्लक कौटुंबिक कारण खुनाच्या वादाला कारणीभूत ठरल होते. प्रभू शिंदे हा आरोपीचा चुलत भाऊ तर अमर शिंदेचा काका लागतो. प्रभू याने सळाखीने पायावर वार केला तर अमरने दांड्याने डोक्यावर वार केला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे यातील अंबर शिंदे याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून तो तडीपार झालेला गुन्हेगार आहे.
सात वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबादास सुनगार, मदत सहाय्यक पोलिस निरीक्षक चहांदे व राऊत यांनी काम पाहिले. दरम्यान हा खला सुरू असतानाच प्रभू शिंदे याचे ३० एप्रिल २०२१ ला निधन झाल्याने त्याला शिक्षेतून त्याला कमी करण्यात आले. तर दुसरा आरोपी अंबर शिंदे यास जेवढे दिवस कारागृहात बंदी होता तेवढ्याच दिवसाची सजा सुनावण्यात आली. तसेच द्रव्यदंड म्हणून दोन लाख रुपये आणि न भरल्यास दोन वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मृत मंगेश शिंदेची वारस मोनाली व मुलगा पवन यांना द्रव्य दंडातील रक्कम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.