शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मांगलीबांध जलाशय बनू शकतो पर्यटनाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:00 AM

मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.

ठळक मुद्देरात्रीला होते प्राण्यांचे दर्शन : काठावरच वसले हनुमंताचे मंदिर

मुखरू बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : निसर्गाच्या मुक्तहस्ताने उधळण ठरलेलं लाखनी तालुक्यातील मांगलीबांधचे नयनरम्य जलाशय पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. या परिसराच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.या तलावात उन्हाळ्याच्या दाहकतेत तरुण मंडळी पोहण्याचा आनंद घेत असतात. तलावाशेजारी टेकड्या आहेत. ४८४ एकरात या तलावातून भात शेतीच्या सिंचन केले जाते आणि दरवर्षाला एक लक्ष रुपयांची मत्स्य शेती यातून निर्मिती केली जाते. या तलावात आजही वीस फूट पाणी आहे.वन विभागाचे या निसर्गरम्य वातावरणात नियंत्रण आहे. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये याकरिता वनविभागाचे कर्मचारी कर्तव्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषद सदस्य विनायक बुरडे यांनी या मंदिराचा शासकीय निधी अंतर्गत कायापालट करून रुबाबदार देखणा व पर्यटनासाठी मांगली बांध पात्र ठरला आहे.मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, आंबा हे विस्तीर्ण वनराई सुशोभित आकर्षक दिसत आहे. फळांची, फुलांची झाडे मंदिराच्या अगदी समोरासमोर देखण्या रूपात दिमाखात उभी आहेत.सरपंच प्रशांत मासूरकर व आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली गावातीलच तीन तरूणांना या मंदिरात क्वारंटाईन केले आहे. परिसराबाबत ज्येष्ठ नागरिक गजानन मानकर यांनी अभ्यासात्मक माहिती दिली.रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी मांगलीबांध तलावात गर्दी करतात. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मांगली बांध हे परीचीत असून पर्यटनाच्या दृष्टीने अधिक लक्ष पुरविल्यास निश्चितच भविष्यात मोठे पर्यटन क्षेत्र उदयाला येऊ शकतो, यात शंका नाही.या तलावाशेजारी जंगलात मोर, लांडोर, बगळा, विदेशी पक्षी तसेच प्राण्यात वाघ हिरण नीलगाय अस्वल रानडुक्कर रानकुत्रे अशी विविध जातीचे प्राणी मुक्त संचार करीत आहेत. या जलाशयाचे व विस्तीर्ण वनराईचे सदस्य आहेत.मांगली बांध खासगी मालकीचे जलाशय असून या ठिकाणाहून भातशेतीला सिंचन करण्यात आले. वन्यप्राण्यांसाठी हा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटन विकास अंतर्गत शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पर्यटन स्थळाएवढे महत्त्व येऊ शकते.-प्रशांत मासूरकर,सरपंच, मांगलीबांध.

टॅग्स :tourismपर्यटन