आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत. दिवसागणिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी आता ‘अॅग्रीकोज’ने पुढाकार घेतला आहे. साकोलीत अॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्व विदर्भातील सुमारे ५०० च्यावर कृषी कर्मचारी सहभागी झाले होते.साकोली येथील एकोडी मार्गावरील आशिर्वाद सभागृहात या अॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी पदवी व पदविका घेतलेल्या काहिंनी काही वर्षापूर्वी नागपूरला असताना ‘अॅग्रीकोज’ची स्थापना केली होती. यामाध्यमातून कृषी कर्मचाºयांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले. सुरूवातीला काही दिवसाच्या कामानंतर कामाच्या व्यापामुळे दुरावलेले सहकारी पून्हा एकत्र यावे, यासाठी या ‘अॅग्रीकोज’ मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला प्रामुख्याने प्रकाश बाळबुद्धे, विजय बाहेकर, समीर ईलमे, हेमंत खराबे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित कृषी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी अॅग्रीकोजसमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना तथा भविष्यातील संकटांना कसे सामोरे जायचे यावर कृषी सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करणाºया तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त दुरवर असलेल्या व केवळ मोबाईलवर संपर्कात असलेल्या दुरावलेल्या शेकडो सहकाºयांची उपस्थिती होती. या माध्यमातून अनेक वर्षानंतर सर्वांचे मनोमिलन झाले. दरवर्षी अॅग्रीकोजचा मेळावा आयोजित करण्याचा ठराव उपस्थितांनी घेतला.
कृषी कर्मचाऱ्यांचे ‘अॅग्रीकोज’मधून मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:02 AM
कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत.
ठळक मुद्देसाकोलीत मेळावा : ५०० च्यावर कृषी कर्मचाऱ्यांचा सहभाग