शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

मनोहरभाई पटेलांनी शिक्षित करण्याचे महान कार्य केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:36 AM

भंडारा : स्व. मनोहरभाई पटेल हे स्वत: शिक्षित नसताना गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ...

भंडारा : स्व. मनोहरभाई पटेल हे स्वत: शिक्षित नसताना गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. यामुळेच गुणवंत विद्यार्थी घडत असून, त्यांनी देश-विदेशात नाव कोरले आहे. मनोहरभाई पटेलांनी स्वत: अशिक्षित असल्याचा न्यूनगंड कधीच बाळगला नाही, तर समाज कसा शिक्षित करता येईल, या ध्येयाला प्रेरित होऊन कार्य केले. यासाठी त्यांनी तीव्र इच्छाशक्ती आणि समर्पणाची भावना जपल्यानेच त्यांना हे महान कार्य करता आले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मनोहरभाई पटेल यांचा ११५ वा जयंती कार्यक्रम मंगळवारी (दि. ९) स्थानिक नमाद....... महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल हे होते. यावेळी आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहषराम कोरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, नरेंद्र भोंडेकर, अभिजीत वंजारी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. राजेंद्र जैन, माजी खा. खुशाल बोपचे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, विलास शंगरपवार, अनिल बावनकर, के. आर. शेंडे, विजय शिवणकर उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सामाजिक कार्य करीत असताना समर्पण आणि त्यागाची भावना जपावी लागते. मनोहरभाई पटेल यांनीसुद्धा हाच धागा पकडून कार्य केले. त्यामुळेच त्यांना हे सर्व करता आले. ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ हा मूलमंत्र जपून सर्वांनी कार्य केल्यास समाजाची प्रगती शक्य आहे. स्व. मनोहर पटेल यांनी शिक्षणरूपी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करण्याचे कार्य खा. प्रफुल्ल पटेल हे करीत असून, ही खरोखरच गौरवाची बाब आहे. यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. खा. पटेल म्हणाले, स्व. मनाेहरभाई पटेल हे दृष्टी बाळगणारे होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची गंगा आणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे महान कार्य केले. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असतो; पण या जयंती कार्यक्रमाचे फार वेगळे महत्त्व असून तो आमच्या भावनांशी जुडलेला असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले.

राज्यपालांनी केला मोदींचा गुणगौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच मूलमंत्र आत्मसात करून कार्य करीत आहेत. त्यांचे धडाडीचे निर्णय, दूरदृष्टी आणि आक्रमक शैलीमुळे भारताचे नाव आज सर्वत्र आदराने घेतले जाते. ही खरोखर देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हाच मूलमंत्र सर्वांनी जोपासण्याची गरज असल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुणगौरव केला.

या गुणवंतांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी अभ्यासक्रमात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आस्था अनिलकुमार बिसेन व निष्ठा राजेशसिंह, श्रेया ओमप्रकाश रहांगडाले, ट्विंकल संजय उके, आदिती प्रेमकुमार भक्तवर्ती, जयेश पुरन रोचवानी, पुष्पा ग्यानसिंग लिल्हारे, रिया गोवर्धन नोतानी, साक्षी शैलेंद्र प्रसाद, अनिकेत दिलीप खंडारे, ऋतुजा जागेश्वर वाघाये, पूजा अश्विन मेहता, भाग्यश्री घनश्याम बोरकर, रोशनी पिजानी, रूपाली प्रदीप बुरडे, श्वेता अनिल पडोले आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मी दोन्ही जिल्ह्यांचा पालक- प्रफुल्ल पटेल

गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत कार्य करीत असताना आपण कधीच कुणाबद्दल भेदभावाची भावना बाळगून कार्य केले नाही, तर दोन्ही जिल्ह्यांचा पालक म्हणूनच सदैव कार्य करीत आहे. यापुढेसुद्धा या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, याच दृष्टीने आपले प्रयत्न असणार असल्याची ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.