जागतिक युवा कौशल्य दिन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादनभंडारा : कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाद्वारे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्याच बरोबर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होवून बेरोजगारीला आळा घालण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. जागतिक युवा कौशल्य दिनाचा कार्यक्रम बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचे राष्ट्रीय धोरण व महत्व दुरदर्शनच्या माध्यमातून संबोधित केले, त्याचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. कार्यक्रमाला विविध कार्यालयाचे प्रमुख, अशोक लेलँड गडेगाव, सनफ्लॅग आर्यन इंडस्ट्रीज भंडारा, महाराष्ट्र मेटल पावडर मारेगाव, इलाइट लि. कारधा व जिल्ह्यातील उद्योग संबंधित असोशिएशनचे प्रतिनिधी, तसेच संस्थाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कौशल्य विकासाद्वारे मनुष्यबळाची निर्मिती
By admin | Published: July 18, 2015 12:41 AM