शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

लघु पाटबंधारे विभागाला मनुष्यबळाची खिळ; मंजूर २४ पैकी १७ पदे रिक्त

By युवराज गोमास | Published: August 11, 2023 2:58 PM

२०१६ पासून पदभरती नाही : अभियंत्यांना शारिरिक व मानसिक झळ

भंडारा : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे (जलसंधारण) विभागाला मनुष्यबळाअभावी खीळ बसली आहे. जलसंधारणांची महत्वपूर्ण कामे रखडली आहेत. शासनाकडून प्राप्त निधी वेळेत खर्च नसल्याने परत जातो. विभागात एकूण २४ पदांना मान्यता असतांना केवळ ७ पदे भरली आहेत, तर १७ पदे रिक्त आहे. यामुळे कामांचा ताण वाढला असून अभियंत्यांना शारिरिक व मानसिक झळ सहन करावी लागत आहे.

भंडारा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मामा तलाव, लपा तलाव व बोळ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, वर्षांनुवर्षांपासून गाळ साचल्याने तलाव उथळ असून सिंचन क्षमता बेताची आहे. शिवाय पाळ व गेट नादुरूस्त तर नाल्यांवरील बंधाऱ्यांची स्थिती खराब आहेत. जिल्ह्यात जलसंधारणाची मोठी क्षमता असतांना मात्र, जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागात रिक्त पदांमुळे विकास कामांचा बोजवारा उडतो आहे.

गत पाच वर्षांपासून रिक्त पदांची स्थिती कायम आहे. परंतु, शासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून असल्याने स्थिती आणखीच बिकट आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत जलयुक्त शिवार योजना, जिल्हा वार्षीक योजना, राज्य सरोवर संवर्धन, जलशक्ती योजना, धडक सिंचन विहिर योजना, गाळमुक्त धरण, मामा तलाव पुनर्जीवन आदी व अन्य योजनांची कामे होत असतात.

लघु पाटबंधारे विभागाची कामे

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत लपा तलाव दुरूस्ती, मामा तलाव दुरूस्ती, कोल्हापूरी बंधारे बांधकाम व दुरूस्ती, साठवण बंधारे बांधकाम व दुरूस्ती, बंधारे बांधकाम व दुरूस्ती आदी कामे होतात. यामुळे जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होते.

नियोजीत कामे व मंजूर निधी

जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील १०० गावांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातंर्गत ७४ कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांवर १० कोटी ३२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत ५ कोटी ४६ लाखांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. या निधीतून लपा तलाव व मामा तलाव दुरूस्तीची कामे होणार आहेत.

संवर्गाचे नाव - मंजूर पदे - भरलेली - पदे रिक्त पदे

जिल्हा जलसंधारण अधिकारी १ - १ - ०सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी १ - ० - १उपविभागीय जलसंधारण अधिकारी ३ - १ - २जलसंधारण अधिकारी १९ - ५ - १४एकूण २४ - ७ - १७

मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विकास कामांवर परिणाम होत आहे. लोकांची कामे रखडतात. विकास कामांचे नियोजन आराखडे व अंमलबजावणी वेळेत होत नाही. शिवाय शासन निधीही १०० टक्के खर्च होत नाही.

- सुभाष कापगते, जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प. भंडारा.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पEmployeeकर्मचारीjobनोकरीbhandara-acभंडाराzpजिल्हा परिषद