बॉक्स
ऑनलाईन बुकिंगची आकडेवारी घटली
भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने भंडारा बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. यासोबतच जिल्ह्याबाहेरील शासकीय अधिकारी, कर्मचारी कोरोना संसर्गापूर्वी तिकीट ऑनलाईन बुकिंग करत होते. मात्र, ही आकडेवारी घटली असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी एसटीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे.
कोट
मला एसटीमध्ये अर्धे तिकीट लागते. लांब जायचे नसल्याने मी कधीच ऑनलाईन रिझर्वेशन केले नाही. माझा प्रवास जास्त करून ४० वर्षांपासून एसटीनेच सुरू आहे. आता गाड्यांची सोय झाली नाही तर पूर्वी एसटीशिवाय पर्यायच नव्हता.
बाबूराव गिरेपुंजे, प्रवासी.
एसटीचे ऑनलाईन रिझर्वेशन होते हे माहिती आहे; परंतु भंडारा बसस्थानकात मात्र दीड वर्षापूर्वी ही सुविधा बंद असल्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. त्यानंतर मी चौकशीसाठी गेलो नाही.
सागर मेश्राम, प्रवासी.
कोट
प्रवाशांसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. भंडारा आगारातून अकोला, अमरावती, यवतमाळ एसटी बसेस सुरू आहेत. प्रवाशांनी एसटीच्या ऑनलाईन रिझर्वेशन सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भंडारा बसस्थानकात प्रवाशांना चौकशी करता येईल.
फाल्गुन राखडे,
आगारप्रमुख, भंडारा
बॉक्स
लालपरीपेक्षा शिवशाहीलाच अधिक पसंती
भंडारा ते नागपूर अंतर साठ किलोमीटर आहे. या मार्गावर शिवशाही नॉन स्टॉप धावत असल्याने प्रवाशांची सर्वाधिक पसंती शिवशाहीलाच असल्याचे दिसून येते. अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी शिवशाही नॉनस्टॉप धावत असल्याने पसंती देतात. याचे एकमेव कारण म्हणजे कमी वेळात भंडारा, नागपूरला पोहोचते. एसटीच्या तुलनेत कमी थांबे असल्याने शिवशाहीलाच अधिक पसंती असल्याचे प्रवाशांनी सांगितले.